या तारखेला ISRO लॉंच करणार सर्वात आधुनिक सॅटेलाईट INSAT-3DS, पाहा काय फायदा होणार ?

| Updated on: Feb 09, 2024 | 2:49 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आपला नवा सॅटेलाईट लॉंच करणार आहे. या सॅटेलाईटचे नाव INSAT-3DS असे आहे. या सॅटेलाईटला मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स याने फडींग केले आहे. जानेवारी महिन्यात हा सॅटेलाईट लॉंच होणार होता. परंतू त्याचे लॉंचिंग त्यावेळी पुढे ढकलण्यात आले होते.

या तारखेला ISRO लॉंच करणार सर्वात आधुनिक सॅटेलाईट INSAT-3DS, पाहा काय फायदा होणार ?
INSAT-3DS
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : भारताला नैसर्गिक संकटापासून पूर्व सूचना देणारा उपग्रह इस्रो 17 फेब्रुवारीला लॉंच करणार आहे. या INSAT-3DS या उपग्रहाला मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स या मंत्रालयाने तयार केले आहे. या उपग्रहाला GSLV रॉकेटवरुन सायंकाळी आंध्रप्रदेशातील श्री हरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन लॉंच करण्यात येणार आहे. या सॅटेलाईटला जियोसिंक्रोनस ट्रांसफर ऑर्बिट ( GRO ) मध्ये तैनात करण्यात येणार आहे. रॉकेटच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. या सॅटेलाईटला रॉकेटच्या शेवटचा टप्पा म्हणजे NOSE मध्ये ठेवण्यात येणार आहे.

या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल सिस्टीमची माहीती पुरविणे हा असणार आहे. या शिवाय हा उपग्रह बचाव कार्यातही देखील मदत करणार आहे. इनसॅट-3 सिरीजच्या सॅटेलाईटमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारचे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स आहेत. हा सातवा सॅटेलाईट आहे. इनसॅट सिरीजच्या पहिल्या सर्व सॅटेलाईटना साल 2000 ते 2004 दरम्यान लॉंच केले गेले. ज्यामुळे दूरसंचार, टीव्ही ब्रॉडकास्ट आणि हवामान संदर्भातील माहीती मिळत आहे. या सॅटेलाईट्समध्ये 3 ए, 3 डी आणि 3 डी प्राईम सॅटेलाईट्समध्ये हवामानासंबंधीत आधुनिक यंत्रे बसविली आहेत. हे सर्व कृत्रिम उपग्रह भारत आणि आजूबाजूच्या हवामान बदलासंबंधी अचूक आणि आगाऊ माहीती देत असतात. यातील प्रत्येक उपग्रहाने भारत आणि आजूबाजूच्या परिसरातील दूरसंचार तंत्रज्ञान आणि हवामानासंबंधी तंत्रज्ञानाला विकसित करण्यास मदत केली आहे.

सॅटेलाईट्स कुठे तैनात होतात

या सॅटेसाईट्सना भूमध्य रेषेच्यावर तैनात केले जात असते. ज्यामुळे भारतीय उपखंडावर बारीक नजर ठेवणे शक्य होते. या सॅटेलाईट्सला मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सने आर्थिक मदत केली आहे. या सॅटेलाईट्सचे वजन 2275 किलोग्रॅम आहे. या सॅटेलाईटमध्ये 6 चॅनल इमेजर आणि 19 चॅनल साऊंडर मेटियोरोलॉजी पेलोड्स असणार आहेत. या सॅटेलाईट्सचे संचलन इस्रोसह भारतीय हवामान खाते ( IMD ) करते. त्यामुळे जनसामान्यांना नैसर्गिक संकट येण्यापूर्वी माहीती देता येणे शक्य होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे शक्य होते. इस्रोची या वर्षातील ही दूसरी सॅटेलाईट लॉचिंग ठरणार आहे. आधी या सॅटेलाईटला जानेवारीत लॉंच केले जाणार होते. परंतू त्याचे लॉंचिंग पुढे ढकलेले.