ISRO महिला रोबोट आधी अंतराळात पाठविणार, ‘गगनयान’ मोहीमेची माहीती सरकारने दिली

| Updated on: Aug 26, 2023 | 9:46 PM

भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग करीत इतिहास रचला आहे. आता गगनयान मोहीमेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

ISRO महिला रोबोट आधी अंतराळात पाठविणार, गगनयान मोहीमेची माहीती सरकारने दिली
vyommitra_gaganyaan_robot
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : एकीकडे भारताने चंद्रयान-3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवून भल्याभल्या देशांना हादरविले आहे. चंद्रायान-3 चा विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर आता चंद्राच्या पृष्ठभागावर कार्यरत झाले आहेत. तसेच त्यांना नेमून दिलेले काम ते करीत आहेत. त्यामुळे आता अंतराळ कार्यक्रमात भारताने आघाडी घेतली आहे. लवकरच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आता आपली बहुचर्चित ‘गगनयान’ मोहीम हाती घेतली आहे. या गगनयान मोहीमेत अंतराळात आधी महीला रोबोट अंतराळात पाठविणार आहे.

भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग करीत इतिहास रचला आहे. या घटनेने चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लॅंडींग करणारा भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश बनला आहे. तर चंद्राची डार्कसाईट दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा पहीला देश ठरला आहे. या घटनेनंतर 2 सप्टेंबर रोजी इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिले आदित्य एल-1 हे यान पाठविणार आहे. त्यानंतर आता चंद्रावर मानव पाठविण्याच्या गगनयान मोहीमेची पूर्व तयारी सुरु होत आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एनडीटीव्ही जी 20 परिषदेत माहीती देताना सांगितले की भारताच्या गगनयान मोहीमे अंतर्गत ‘व्योमित्रा’ ही महिला रोबोट अंतराळात पाठविणार असल्याचे सांगितले. सिंह पुढे म्हणाले की आधी ट्रायल स्पेस फ्लाईट ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाठविण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ दुसऱ्या मोहीत महिला रोबोट ‘व्योमित्रा’ अंतराळात पाठविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून रोबोट आधी पाठविणार

भारताची गगनयान मोहीम कोरोनाकाळामुळे रखडली आहे. आता आम्ही पहिले ट्रायल मिशन ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महीन्यात राबविणार आहोत. अंतराळात अंतराळवीर पाठविण्याबरोबर त्यांना पुन्हा सुखरुप परत आणणे हे देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. दुसऱ्या मिशनमध्ये आम्ही मानवासारख्या सर्व हालचाली करणाऱ्या फिमेल रोबोटला अंतराळात पाठविणार आहोत. जर ही मोहीम सुरळीत पार पडली त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ असे सिंह यांनी सांगितले.

आम्ही सर्व खूप नर्व्हस होतो

इस्रोच्या टीमशी जुळलेले सर्व जण या चंद्रयान-3 मोहीमेच्या अंतिम टप्प्यावेळी नर्व्हस होते. जेव्हा चंद्रयान-3 जेव्हा पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या कक्षेत गेले त्यावेळी आपण खूपच नर्व्हस होतो…परंतू लॅंडींग खूपच सॉफ्ट झाल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाने अंतराळ क्षेत्र बंधनातून मुक्त झाले आहे. 2019 पर्यंत श्रीहरिकोटा येथे कोणलाही प्रवेश नव्हता. आता येथे लहान मुले आणि मिडीया मुक्त प्रवेश दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.