बंगळुरु | 14 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 एकीकडे चंद्रावर स्वारी करण्यासाठी निघाले असताना आता भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सुर्ययान मोहीमेची तयारी सुरु केली आहे. सूर्ययान मोहीमेंतर्गत आदित्य – एल 1 हे पहिले सुर्ययान आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रात आणून ठेवले आहे. लवकरच हे यान अंतराळात झेपावणार आहे. सूर्यावरील घडामोडी चुंबकीय वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे.
भारताचे महत्वांकाक्षी चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. या दरम्यान भारत आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य – एल 1 हे यान सोडणार आहे. बंगळुरू येथील यूआर राव उपग्रह केंद्रात हे आदित्य – एल 1 हे यान तयार करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर हे यान पोहोचल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
आदित्य – एल 1 अंतराळ यान सुर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान हालो ऑर्बिटमध्ये लॅगरेंज पॉईंट – 1 येथून सुर्याचा अभ्यास करणार आहे. हे अंतर पृथ्वीपासून 15 लाख किमी इतके दूर आहे. या सूर्ययानाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉंच करण्याची शक्यता असल्याचे इस्रोने म्हटले आहे. सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या हालो ऑर्बिटवरील हा एल-1 पॉईंट येथून कोणत्याही अडथळा आणि ग्रहणाशिवाय सूर्याचे सातत्याने निरीक्षण करणे शक्य होणार आहे. सुर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या L1 या कक्षेतून चार पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करणार आहेत. आणि उर्वरित तीन पेलोड्स L1 वर सूर्य कणांचा आणि मॅग्नेटीक फील्डचा अभ्यास करतील अशी माहीती सूत्रांनी दिली आहे
या सू्र्ययानात एकूण सात पेलोड आहेत. यातील सहा पेलोड इस्रोने तर एक पेलोड अन्य संस्थेने तयार केला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरचा वापर करून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण या सात पेलोडद्वारे करण्यात येणार आहेत.
इस्रोचे ट्वीटर पाहा –
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
Aditya-L1, the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is getting ready for the launch.
The satellite realised at the U R Rao Satellite Centre (URSC), Bengaluru has arrived at SDSC-SHAR, Sriharikota.
More pics… pic.twitter.com/JSJiOBSHp1
— ISRO (@isro) August 14, 2023
आदित्य एल-1 हे भारताचे पहिले सोलर मिशन आहे. यातील सर्वात महत्वाचा पेलोड व्हीजिबल लाइन एमिसन कोरोनाग्राफ ( VELC ) हा आहे. या पेलोडला इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सने तयार केले आहे. VELC सूर्याचे एचडी फोटो काढेल. या यानाला PSLV रॉकेटवरुन लॉंच केले जाणार आहे. पेलोडवरील वैज्ञानिक कॅमेरा सूर्याची हाय रेझोल्यूशनचे फोटो काढेल. तसेच स्पेक्ट्रोस्कोपी आणि पोलॅरीमेट्रीही करणार आहे.