हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शनिवारी दुपारी ११.५० वाजता सौर मिशन आदित्य एल १ लाँच केलं. या मिशनच्या माध्यमातून ISRO आदित्य एल १ त्या पाईंटला पोहचेल जिथून सूर्य व्यवस्थितपणे पाहता येईल. हे मिशन एल १ पाईंट सूर्याच्या तापमानापासून वादळाची कारण समजून घेता येतील. तसेच आणखी काही माहिती या माध्यमातून गोळा करता येईल. आदित्य एल १ १५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल. आदित्य एल १ बराच हायटेक आणि स्मार्ट आहे. यातील उपकरण हे अॅडव्हान्स आहेत. बेंगळुरूचे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सचे प्रोफेसर जगदेव सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्रोफेसर जगदेव सिंह एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, आदित्य एल १ स्मार्ट आहे. यासाठी व्हिजीबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ पेलोड डेव्हलप करण्यात आलंय. आदित्य एल १ च्या माध्यमातून याला अंतराळात नेले जाईल.
सौर मिशन आदित्य एल १ चे वजन १ हजार ४७५ किलो आहे. यामध्ये सात पेलोड राहणार आहेत. यापैकी चार पेलोडचे तोंड सूर्याकडे राहील. तीन इतर पेलोड तेथील पार्टिकल्स आणि मॅग्नेटीक फिल्डचा अभ्यास करतील. यामुळे येथून मिळणारा डाटा महत्त्वाचा राहील. या माध्यमातून सूर्याच्या वेगवेगळ्या भागाचा अभ्यास करता येणार आहे. प्लाज्माचे तापमान का वाढते. या नव्या आणि हायटेक मिशनमधून आणखी काही गोष्टींचा खुलासा होणार आहे.
हायटेक असला तरी सोलर मिशन आदित्य एल १ समोर काही आव्हानं आहेत. नासाचे माजी वैज्ञानिक डॉ. मित्रा म्हणतात, आदित्य एल १ जाणार असलेला पाईंट स्थिर मानला जातो. येथून सूर्यावर नजर ठेवता येणार आहे. पण, सर्वात मोठा प्रश्न या पाईंटपर्यंत पोहचणे हा आहे. कारण या पाईंटवर तापमान आणि रेडिएशन जास्त असतात. सूर्याच्या प्रखर तापमानापासून दूर राहून मिशन पूर्ण करावे लागणार आहे.
आदित्य एल १च्या लाँचिंगसाठी पीएसएलव्ही सी ५७ चा वापर केला गेलाय. भारतानं स्पेस मिशनसाठी पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॅकेटला निवडले. याच माध्यमातून मिशन लाँचिंग केले जाते. या पद्धतीचा वापर यापूर्वी यशस्वी झाला आहे. नासाच्या तुसनेत कमी बजेटमध्ये हे स्पेस मिशन तयार करण्यात आले.