नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) एका खटल्याप्रकरणी सुनावणी देताना मुलाला चांगालंच सुनावलंय. आईची काळजी घेण्यावरुन सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. आईची काळजी घेण्यासाठी घर नव्हे, तर मोठं काळीज लागतं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. यासोबत आईच्या मालमत्तेचा (Mother property) व्यवहार न करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे. 89 वर्षांच्या आईची काळजी घेण्यासाठी बहिणींकडे तिला देऊ नये, यासाठी एका मुलाचे प्रयत्न सुरु होते. हा मुलगा आई तिच्या मुलींनी भेटायला देत नव्हता. तर आईच्या नावावर असलेला दोन कोटीच्या मालमत्तेचा (Family Dispute) व्यवहारही हा मुलगा करण्याच्या बेतात होता. त्यामुळे कोर्टात दोघींनी याचिका दाखल केली होती. आपला भाऊ आईला भेटायला देत नसल्याचं म्हणत हेबिअस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आलेली होती. यावर सुनावणी देताना कोर्टानं मुलाला फटकारलंय. तसंच आईचा ताबा मुलींकडे देणार की नाही, असा प्रश्न विचारलाय.
89 वर्षांच्या महिलेला स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. या वृद्ध आईची काळजी बहिणींना घेता येणार नाही, असा दावा तिच्या मुलानं केली होता. बहिणींच घर लाहन असल्यानं त्यांना आईची योग्य काळजी आणि निगा राखता येणार नाही, असं मुलानं म्हटलं होतं. या मुलाचा आईच्या संपत्तीवर डोळा असल्याचा संशय बहिणींना होता. तसंच हा मुलगा आपल्या बहिणींना आईशी भेटूही देत नव्हता.
कृष्ण कुमार सिंह असं या मुलाचं नाव आहे. मोठा भाऊ कृष्ण कुमार सिंहविरोधात त्याच्या बहिणींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायलायत हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केलेली. या याचिकेवर न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी याचिकाकर्त्या बहिणीच्या वकिलांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. मोठा भाऊ आईची काळजी घेत नाही. शिवाय तिला स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. हावभावाद्वारे तिला कसलंच आकलन होतं नाही. आईच्या दोन कोटी रुपयांच्या मालमत्तेचा व्यवहार मात्र भावाद्वारे केला जातोय, असं कोर्टासमोर सांगितलं.
याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं मुलगा कृष्ण कुमारला सुनावलंय. तुम्हा तुमच्या आईच्या मालमत्तेत जास्त रसत आहे, असं म्हणत फटकलाय. सोबत मुलींना आशी भेटण्याची परवानगीदेखील कोर्टानं दिली. इतकंच काय तर आईच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा व्यवहार करु नये, असं देखील मुलाला बजावण्यात याप्रकरणी सुनावणी तहकूब करण्यात आली.