नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval ) यांचा मुलगा विवेक डोवाल (Vivek Doval) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनीही जयराम रमेश यांनी मागितलेल्या माफीला स्वीकारले आहे. (Jairam Ramesh apologize son of Ajit Doval in defamation case)
जयराम रमेश यांनी एका मासिकात छापून आलेल्या लेखाचा आधार घेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोवाल यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. त्याविरोधात विवेक डोवाल यांनी जयराम रमेश तसेच एका मासिकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. यामध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पित्याची बदनामी केली जात असल्याचा आरोप विवेक डोवाल यांनी केला होता.
विवेक डोवाल यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “त्या वेळी निवडणुका चालू होत्या. विवेक डोवाल यांच्याविरोधात मी रागाच्या भरात वक्तव्य केले होते,” असे जयराम रमेश यांनी सांगितलं.
तसेच, विवेक डोभाल यांच्याविरोधात मी उत्साहात येऊन वक्तव्य केले. काहीही टिप्पणी करण्यापूर्वी मी त्या लेखाचा अभ्यास करायला हवा होता,” असेही जयराम रमेश म्हणाले.
Vivek Doval, son of NSA Ajit Doval accepts apology from Congress leader Jairam Ramesh, in connection with a criminal defamation case filed against Ramesh and Caravan magazine for their alleged defamatory statement and article against Doval
— ANI (@ANI) December 19, 2020
विवेक डोवाल यांनी मोठ्या मनाने माफी स्वीकारली
जयराम रमेश यांनी केलेल्या टिप्पणीमुळे अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल यांनी जयराम रमेश यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. हा खटला अजूनही सुरु होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी उत्साहात येऊन मी ते वक्तव्य केले असल्याचे सांगत विवेक यांची माफी मागितली. त्यानंतर विवेक डोवाल यांनी जयराम रमेश यांच्यावरोधात केलेली अब्रुनुकसानीची तक्रार मागे घेत जयराम रमेश यांची माफी स्वीकारली आहे. तसेच, या वादावर आता पडदा पाडला आहे.
दरम्यान, जयराम रमेश यांच्याविरोधात तक्रार असल्यामुळे लोकप्रतिनिधींशी संबंधित खटल्यांवरील सुनावणीसाठी असलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी केली जात होती. मात्र, जयराम रमेश यांनी माफी मागितल्यानंतर आता हा खटला फक्त त्या मासिकाविरोधातच चालवला जाईल. यापुढे या खटल्याची सुनावणी आता सामान्य न्यायालयासमोर होईल.
संबंधित बातम्या :
पीएम केअर फंडात जवानांनी किती पैसे दिले ? वाचा हा रिपोर्ट
Reservation: आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं भाष्य
(Jairam Ramesh apologize son of Ajit Doval in defamation case)