नवी दिल्लीः देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) पदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेतेही नेत्यांची नावं घेऊन अध्यक्षपदासाठी नावंही जाहीर करत आहेत. गुरुवारीच काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांचे नाव घेत गेहलोत शशी थरुर यांच्यापेक्षा चांगले उमेदवार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress) दुसऱ्याच दिवशी निवेदन जाहीर करून पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची कोणतीही माहिती जाहीर करू नये असे निर्देश प्रवक्ते आणि संपर्क कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली चालू झाल्या. त्यातच काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अशोक गेहलोत यांनी शशी थरूर यांच्यापेक्षा अशोक गेहलोत चांगलेच उमेदवार असल्याचे म्हटले होते.
त्यामुळे दुसर्याच दिवशी काँग्रेसने निवेदन जाहीर केले. आणि पदाधिकाऱ्यांना सुचनाही देण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही टीका टिप्पणी न करता त्यापासून दूर राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.
काँग्रेस अध्यक्ष पदाची तुलना कधीच एकमेकांशी होणार नसल्याचेही गौरव वल्लभ यांनी मत व्यक्त केले होते. प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अशोक गेहलोत यांच्यावर स्तुती सुमनं उधलताना त्यांची तुलना शशी थरूर यांच्याबरोबर केली होती.
ही तुलना करताना त्यांनी सांगितले की, एकीकडे अशोक गेहलोत म्हणजे ज्यांनी तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद, तीन वेळा मुख्यमंत्रीपद, पाच वेळा खासदारकी आणि पाच वेळा आमदारकी लढवली आहे.
तर त्यांना मोदींविरोधातही लढण्याचा अनुभव असून त्यांच्या पाठीशी 45 वर्षांचा निकोप राजकीय जीवनाचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले होते.
तर वल्लभ यांनी दुसरीकडे, शशी थरूर यांच्यावर बोलताना म्हणाले की, शशी थरुर यांचे गेल्या 8 वर्षात पक्षासाठी मोठे योगदान आहे, ते म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना त्यांनी पत्र पाठवले होते. मात्र शशी थरुर यांच्या या कृत्तीमुळे अनेक कार्यकर्तेही नाराज झाले होते.
त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदाची निवड ही सोपी असून त्या पदावर कोणाची निवड होणार हेही स्पष्ट आहे अशी टिप्पणी त्यांनी केली होती.