नवी दिल्ली : सध्या वेगवेगळ्या मुद्यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि काँग्रेसचे अधूनमधून इतिहासातील वेगवेगळ्या मुद्यांवरून वाद उफाळून येत आहेत. त्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा इतिहासातील एका मुद्यावरून वाद उखरून काढला आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही कारण 1940 पर्यंत नेताजी सुभाषबोस चंद्र यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती.
त्यावर त्यांचेही मत असू शकते पण तो प्रश्न त्यांच्या विरोधातील असू शकतो. मात्र डोभालही आता इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या गटात सामील झाल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
जयराम रमेश यांनी अजित डोवाल यांना सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. यावर त्यांनी सांगितले की, अजित डोवाल यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात नाहीत. मात्र सध्या ते एका वेगळ्या टोळीत सामील झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना त्यांनी प्रश्न केला आहे की, नेताजींनी गांधींना आव्हान दिले का? त्याच प्रमाणे नेताजी डावे होते का? अर्थात ते होते. नेताजी धर्मनिरपेक्ष होते का? त्यामुळे नेताजी हयात असते तर फाळणी झाली नसती का? कोण म्हणेल कारण 1940 पर्यंत नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक निर्माण केला होता. या सगळ्यावर तुमचं मत काय असे एका पेक्षा एक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, डोवाल यांच्याकडून एकही गोष्ट स्पष्टपणे बोलले नाहीत. नेताजींचे थोरले बंधू सरतचंद्र बोस यांचा तीव्र विरोध असतानाही बंगालच्या फाळणीला पाठिंबा देणारे श्यामा प्रसाद मुखर्जी होते. त्यामुळे आता मी डोवाल यांना रुद्रांशु मुखर्जी यांच्या 2015 मध्ये आलेले एक उत्कृष्ट पुस्तक पॅरलल लाइव्हजची एक प्रत पाठवत असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आहे. त्या पुस्तकातून त्यांनी तो खरा इतिहास तरी वाचून पाहावा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
याआधी डोवाल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल एक व्याख्यान दिले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की, नेताजी यांच्यामध्ये महात्मा गांधींना आव्हान देण्याचे धाडस होते आणि ते असते तर भारताची फाळणी झाली नसती, तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रे यांनी सांगितले की, भारताच्या फाळणीला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे तितकेच जबाबदार होते. तसेच तृणमूलच्या खासदारानीही सांगितले होते की, मुस्लिम लीगच्या वेगळ्या देशाच्या मागणीला सीपीआयकडूनही पाठिंबा दर्शवला होता.