जम्मू काश्मीर | 29 ऑगस्ट 2023 : छत्रपती शिवाजी महाराज… अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत… शिवरायांना पाहिलं की अंगात उत्साह संचारतो. त्यांचे विचार जगण्याला प्रेरणा देतात. त्यांचं चरित्र कोणतीही गोष्ट करण्याचं धाडस देतात. शिवरायांचं कार्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शिवरायांचं हेच कार्य आता भारतीय सैन्याच्या समोर आता त्यांची प्रेरणा बनून उभं असेल. भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आता एक निर्ण घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शिवरायांचा पुतळा आता सैन्याचं मनोबल वाढवणार आहे.
कुपवाडामधल्या भारतीय सैन्याच्या छावणीत साडे दहा फुट उंचीचा पुतळा बसवला गेला आहे. सैन्यदलाकडून यावेळी जल्लोष करण्यात आला. छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नाचत-गाजत भारतीय जवानांकडून छत्रपतींच्या पुतळ्याचं स्वागत केलं गेलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. राज्यपालांच्या हस्ते पूजन झालेला छत्रपतींचा पुतळा कुपवाडा आणण्यात आला. त्यानंतर त्यांची स्थापना करण्यात आली.छत्रपतींच्या पुतळ्यामुळे सैन्याचे मनोबल उंचावणार आहे. देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी प्रेरणा मिळत राहणार आहे. पण दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत पाकिस्तान सीमेवरील कुपवाडा येथे दाखल..!#ChhatrapatiShivajiMaharaj #Statue #Kupwada #SMUpdate @PMOIndia @AmitShah @JPNadda @TawdeVinod @BJP4India pic.twitter.com/mfwEhOU9aM
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) October 28, 2023
या सगळ्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाक सीमेवर त्या ठिकाणी आपल्या रेझिमेंटने आपल्या सोबत या संदर्भात भव्य दिव्य पुतळा उभारावा, अशी जेव्हा भावना ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेपाशी व्यक्त केली. तेव्हा महाराष्ट्र सरकारने सांगितलं की, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अभिवादन पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्मू काश्मीरकडे रवाना झाला. 2268 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या कुपवाडमध्ये हा पुतळा आणला गेला. या पुतळ्याची स्थापना केली गेली, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
भारत-पाकिस्तान सीमेवर हा पुतळा आतंकवाद्यांना आपल्या देशाची शूरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने दिसेल. तेव्हा निश्चितपणे आमच्या जवानांचा उत्साह वाढेल. शिवराय हे जगाचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या सैनिकांना देखील शिवरायांच्या पुतळ्यामुळे लढण्याचं बळ मिळेल, असं मुनगंटीवार म्हणाले.