नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 2 वर्ष पूर्ण होत असताना जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी जम्मू बसस्थानकावरुन तब्बल साडे सहा किलो इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस अर्थात IED जप्त केलं आहे. त्यामुळे मोठा घातपात टळला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करण्याची संशय होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती.(Jammu and Kashmir Police foiled a plot to carry out terrorist attacks at 4 places in Jammu)
“गेल्या 3-4 दिवसांपासून आम्ही अलर्ट होतो. दहशतवादी पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते आणि हा हल्ला जम्मू शहरात होणार होता. शनिवारी रात्री पोलिसांनी सोहेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. तो संशयितरित्या फिरत होता. सोहेल हा अल बदर तनजीम या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडे चौकशी करत असताना साडे सहा किलो IED सापडले”, अशी माहिती जम्मूचे आयजी मुकेश सिंह यांनी दिली.
We were on high alert as we had inputs that terror groups were planning an attack on the anniversary of Pulwama attack. Last night we arrested a person named Sohail and recovered 6-6.5 kgs of IED from his possession: Jammu Inspector General of Police (IG) Mukesh Singh https://t.co/rtDRYSH0g9 pic.twitter.com/O9Hr8Id3oz
— ANI (@ANI) February 14, 2021
संशयिताकडे चौकशी केली अशता तो नरसिंह कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं त्यानं सांगितलं. तो चंदीगडमध्ये शिकत होता. त्याला पाकिस्तानमधून एक मेसेज आला होता की, या ठिकाणी IED ठेवायचे आहेत. या मेसेजद्वारे IED ठेवण्यासाठी 3-4 जागा सांगितल्या गेल्या होत्या. त्यात रघुनाथ मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार या जागांचा समावेश होता. त्यानंतर त्याला श्रीनगरसाठी प्लाईट घ्यायची होती. तिथे अथर शकील नावाच्या व्यक्तीला भेटायचं होतं. या हल्ल्याची माहिती चंदीगडमधील अजून एका मुलाला माहिती होती, त्याचं नाव काझी वसिम आहे. त्यालाही चंदीगडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यासोबतच हाफिद नवी या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPFच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CRPFच्या त्या 40 जवांना श्रद्धांजली अर्पण केली.
Two years ago on this day, the Pulwama Attack happened. We pay homage to all the martyrs we lost in that attack.
We are proud of our security forces. Their bravery will continue to inspire generations- Watch as PM @narendramodi recites a poem from Mahakavi Subramaniya Bharathi. pic.twitter.com/vpEN2vCGQo
— BJP (@BJP4India) February 14, 2021
चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा दिवस कुणीही विसरु शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली. आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांवर गर्व आहे. त्यांची बहादुरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. देशाच्या सशस्त्र दलांना वारंवार हे सिद्ध करुन दाखवलं आहे की, ते देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या :
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जम्मू बसस्थानकावरुन 7 किलो स्फोटकं जप्त
पुलवामा हल्ला : 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
Jammu and Kashmir Police foiled a plot to carry out terrorist attacks at 4 places in Jammu