जम्मू-काश्मीरः जम्मू काश्मिरमध्ये (Jammu Kashmir) दिवसेंदिवस दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या असल्याचेच दिसत आहे. कारण मागील आठवड्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आज पुन्हा एकदा दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. कुपवाड्यामध्ये (kupwara) सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना ठार केले गेले असून 2 एके-47 आणि 4 हातबॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा (terrorist) खात्मा केला आहे. दहशतवादी माछिल भागात शिरले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोध मोहीम राबवून कारवाईला सुरुवात केली.
त्यावेळी दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार चालू केला, त्यानंतर सुरक्षा दलानेही जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
ही चकमक कुपवाड्यातील माछिल भागातील एलओसी टेकरी नार येथे झाली. या दोन दहशतवाद्यांची अजून ओळख पटलेली नाही.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांना सूचना देऊनही त्यांनी गोळीबार चालू केल्यानंतर भारतीय सैन्यानी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत दहशतवाद्यांकडून दोन एके-47, दोन पिस्तूल आणि चार हातबॉम्बही जप्त केले आहेत.
कुपवाड्यातील माछिल भागातील एलओसी टेकरी नारमध्ये दहशतवादी घुसले असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तिथे शोधमोहीम आखण्यात आली.
त्यावेळी सुरक्षा दलाकडून सूचना देण्यात आल्यानंतरही दहशतवाद्यांनी सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांवर गोळीबार केला.
त्यावेळी प्रत्युत्तर दाखले केलेल्या गोळीबारामध्ये दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दोघा दहशतवाद्यांना ठार केले गेले असले तरी अजूनही शोधमोहीम सुरुच ठेवण्यात आली आहे.
या महिन्यातील ही दुसरी घटना असून 14 सप्टेंबर रोजी सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. मारले गेलेले दहशतवादी गझवत-उल-हिंदबरोबर संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, हे दोघंही दहशतवादी पश्चिम बंगालमधील एका मजुरावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते.
या दहशतवाद्यांची ओळख पटवताना काश्मीरचे एडीजीपी म्हणाले की, एक दहशतवादी एजाज रसूल नजर हा पुलवामाचा रहिवासी होता, तर दुसरा शाहिद अहमद उर्फ अबू हमजा होता.
पुलवामामध्ये शनिवारीच दहशतवाद्यांनी दोन स्थानिक नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हे दोघेही बिहारचे रहिवासी असून त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले आहेत. शमशाद मुलगा इस्लाम शेख आणि फैजान कासरी मुलगा फयाज कादरी (रा. बेतिया बिहार) अशी जखमींची नावे आहेत. दोघंही मजूर म्हणून कामासाठी आले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या आधी शनिवारी रात्री कुलगामच्या कैमोहमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यावेळी एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता.
त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करेपर्यंत दहशतवादी पसार झाले होते. या वर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 136 दहशतवादी मारले गेले असून 10 ते 17 ऑगस्टपर्यंत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे.
2022 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी 38 परदेशी होते, तर 98 स्थानिक दहशतवादी होते. जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 146 दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगण्यात आले असून त्यामध्ये 62 स्थानिक तर 84 परदेशी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या असून त्यांच्यावर आता कडक कारवाई केली जात असून परिसराची तपासणी सुरु केली गेली आहे.