नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाची लस ही भाजपची लस असल्याचं म्हटलं आहे. इतकच नाही तर आपण ही लस घेणार नसल्याचंही यादव म्हणाले आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ही लस कुण्या पक्षाची नाही, आपण आनंदाने ही लस घेऊ, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत. (Omar Abdullah reply to Akhilesh Yadav on Corona vaccine)
‘आपण आनंदाने कोरोनाची लस घेणार आहोत. कारण ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे’, असं अब्दुल्ला म्हणाले. तसंच देशातील जेवढ्या जास्त लोकांनाही ही लस दिली जाईल, तेवढंच ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही उपयुक्त ठरेल, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी अखिलेश यादव यांनी आपण ही लस घेणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण ही लस भाजपशी निगडीत असल्यानं आपला त्यावर विश्वास नसल्याचं यादव म्हणाले होते.
I don’t know about anyone else but when my turn comes I’ll happily roll up my sleeve & get a COVID vaccine. This damn virus has been far too disruptive & if a vaccine helps bring about a semblance of normalcy after all the chaos then sign me up. https://t.co/bVOw7lPJ6w
— Omar Abdullah (@OmarAbdullah) January 2, 2021
अखिलेश यादव म्हणाले, “मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.”
I am not going to get vaccinated for now. How can I trust BJP’s vaccine, when our government will be formed everyone will get free vaccine. We cannot take BJP’s vaccine: Samajwadi Party chief Akhilesh Yadav#COVID19 pic.twitter.com/qnmGENzUBH
— ANI UP (@ANINewsUP) January 2, 2021
यावेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाचं सरकार आल्यानंतर अयोध्येतील नगर पालिका कर रद्द केला जाईल, असं आश्वासनही दिलं. त्यांनी शनिवारी (2 जानेवारी) अयोध्यात जाऊन सर्व धर्मगुरुंची भेट घेत आशिर्वादही घेतले आहेत.
अखिलेश यादव यांच्या कोरोनावरील वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी जीव वाचला तर सर्व काही करता येईल असं म्हटलंय. कोरोना लसीसाठी जगभरातील संशोधकांनी रात्रंदिवस एक करुन काम केलंय. अखिलेश यादव आपल्या राजकारणाचं बुडतं जहाज वाचवण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत.”
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले, “अखिलेश यादव यांना कोरोना लसीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला अखिलेश यादव यांच्यावर विश्वास नाही. लसीवर प्रश्न उपस्थित करणे हा त्या संशोधकांचा अपमान आहे. यासाठी त्यांनी माफी मागायला हवी.”
संबंधित बातम्या:
BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार – मायावती
कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी, ‘ही’ लस ठरणार रामबाण?
Omar Abdullah reply to Akhilesh Yadav on Corona vaccine