नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांविरोधात पोलीस आणि सुरक्षा दलांची कारवाई गेल्या कित्येक दिवसांपासून सुरूच आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीबरोबर त्यांचा खात्माही करण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे की, गेल्या अडीच वर्षांत एका शोपियान जिल्ह्यात 150 दहशतवाद्यांना (150 terrorist killed )कंठस्नान घालण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत शोपियान (Shopian) जिल्ह्यातच 150 दहशतवादी मारले गेल्याने तेथील दहशतवाद्यांची संख्या आता रोडावली आहे. आणि इथून पुढं जरी त्यांच्याबरोबर सामना करावा लागला असला तरी सफरचंदाच्या बागेतील झाडांची पानगळती सुरु होऊल त्यावेळी त्यांच्याबरोबर युद्ध करणे आणखी सोपे जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, शोपियान जिल्ह्यात आता खूप कमी दहशतवादी आहेत. आता त्यांच्याबरोब युद्ध नसलं तरी सफरचंदाच्या बागेतील पानं झडली जातात तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर सामना करणं सोपं जातं असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी विजय कुमार यांनी शोपियान चकमकीबद्दल बोलताना सांगितले की, येथील सुरक्षा दलाला शोपियान प्रातांत 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या भागात तीन दहशतवादी घुसल्याचे कळताच पोलीस आणि सुरक्षा दलांकडून त्यांना घेराव घालण्यात आला, त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षादलात जोरदार चकमक सुरू झाली. या कारवाईत तीनही स्थानिक दहशतवादी मारले गेले. ठार झालेला दहशतवादी दानिश भट्ट हा दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.
याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारण्यात आले होते. शोपियानच्या नागबल भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाकडून घेराव घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली.
दहशतवादाविरोधात ऑपरेशन सुरू करण्यात आल्यानंतर त्या कारवाईत सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी याबद्दल ट्विट केले होते की, “लष्कर-ए-तैयबाचा दानिश खुर्शीद भट, तन्वीर वानी आणि तौसीफ भट अशी तीन ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत, आणि त्यांची ओळख पटली आहे. दहशतवादाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. शोपियानमध्ये तरुणांना दहशतवादाकडे नेण्यात दानिशचा मोठा हात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
जम्मू-काश्मीरचा विचार केल्यास संपूर्ण खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या वर्ष 2022 मध्ये सुरक्षा दलांकडून पहिल्या 6 महिन्यांत म्हणजेच 30 जूनपर्यंत 125 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कालावधीत 172 दहशतवादी आणि संशयितांना पकडण्यात आले आहे.