सैन्य दलावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान शहीद (3 Soldier died) झालेत. यानंतर झालेल्या प्रतिहल्ल्यात सैन्यात दोघाही अतिरेक्यांचा कंठस्नान घातलं. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir Terrorist Attack News) येथील राजौरीमध्ये ही घटना घडली. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय सैन्याचे तीन जवान शहीद झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर लष्काराने केलेल्या प्रत्तुत्तरात दोघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलाय. राजौरीपासून (Rajouri, Jammu Kashmir) 25 किलोमीटर दूर असलेल्या एका सैन्य दलाच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघातकी हल्ला अतिरेक्यानी केला. या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आलं असून आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच चेकपोस्ट कसून तपास केला जातोय.
J&K | In a terrorist attack 25 kms from Rajouri, two terrorists carried out a suicide attack on an Army company operating base. Both terrorists killed while 3 soldiers lost their lives. Operations in progress.
हे सुद्धा वाचा(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Qt7TsAawki
— ANI (@ANI) August 11, 2022
एडीजीपीचे मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार राजौरीच्या दाराहाल भागातील परगलमध्ये सैन्याच्या कॅम्प फेसला पार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान गोळीबारही झाला. दारहल ठाण्याच्या सहा किलोमीटर दूरवर आता अतिरीक्त फौज पाठवण्यात आली आहे. तसंच चकमकीत दोघा अतिरेक्यांचा खात्माही करण्यात आला आहे. तर सोन जवान जखमी झाले असून तिघा जवानांच्या मृत्यूचीही माहिती समोर आली आहे.
सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसून अतिरेक्यांना हल्ला करायचा होता. पण आत्मघातकी हल्ल्याचा कट सैन्याच्या जवानांनी उधळून लावला आहे. या मोठ्या हल्ल्यानंतर आता सैन्य दलाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. नाकाबंदी आणि बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या बडगाम जिल्ह्यातील चकमकीत तिघा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. लष्कर ए तोयबाच्या तिघा अतिरेक्यांचा सैन्यानं चमकीत खात्मा केला होता. अतिरेकी एका ठिकाणी लपल्याची माहिती मिळाल्या नंतर जवानांनी सर्च ऑपरेशन राबवलं होतं. खानसाहिब परिसरातल्या वॉटरहेलमध्ये अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई तिघा अतिरेक्यांना ठार करण्यात आलं होतं.
स्वातंत्र्य दिनाच्या अवघ्या काही दिवसांच्या आधी जम्मू काश्मिरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानं संपूर्ण देशभरातल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देत अलर्ट करण्यात आलं आहे.