मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना कॅन्सर झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर गोयल यांनी गुरुवारी विशेष न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. ‘हळूहळू वाढणाऱ्या कॅन्सर’वर उपचार घेण्यासाठी जामीन मिळावा, अशी याचिका गोयल यांनी न्यायालयासमोर केली. डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांनंतर हा आजार असल्याचे उघड झाल्याचे स्पष्ट झाले. ईडीने त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने गोयल यांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा प्राथमिक आदेश दिला. गेल्या महिन्यात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी गोयल यांना खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यास परवानगी दिली होती.
ईडीने त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने गोयल यांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा प्राथमिक आदेश दिला आहे. गेल्या महिन्यात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी गोयल यांना खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यास परवानगी दिली होती. आपल्या डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमध्ये हा जीवघेणा आजार आढळून आला. वैद्यकीय नोंदीनुसार, गोयल यांच्या आतड्यात एक लहान ट्यूमर आहे, ज्याला ‘न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर’ (हळू-वाढणारा कॅन्सर) असे म्हणतात, असे गोयल यांनी जामीनासाठी केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे या गंभीर आजाराबरोबरच, गोयल यांना सुमारे 35 सेमी ते 40 सेमीचा हर्नियादेखील आहे. गोयल यांनी प्रथम कर्करोगासाठी पीईटी स्कॅन करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर डॉक्टर शस्त्रक्रिया, केमोथेरपीसह उपचारांची दिशा ठरवतील, असे त्या अर्जात लिहीण्यात आले आहे.
20 फेब्रुवारी पर्यंत मेडिकल रिपोर्ट देण्याचे आदेश
ईडीच्या विनंतीनुसार वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची आणि गोयल यांच्या प्रकृतीची कसून तपासणी करण्याचे आदेश जेजे रुग्णालयाच्या डीनना कोर्टातर्फे देण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी पर्यंत यासंदर्भात रिपोर्ट द्यावा असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गोयल यांच्या वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे बोर्ड आजाराची पडताळणी करेल आणि जेजे रुग्णालयात प्रस्तावित उपचार उपलब्ध आहे की नाही याची माहिती देईल, असे न्यायालयाने सांगितले.
जेट एअरवेजचे नरेश गोयल (वय 74) यांना सप्टेंबर 2023 मध्ये ईडीने अटक केली होती. गोयल यांनी कॅनरा बँकेने जेट एअरवेजला दिलेल्या 538.62 कोटी रुपयांच्या कर्जाचा मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार केला होता, असा आरोप करण्यात आला होता.