नवी दिल्ली : अवैध खाण प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate) शुक्रवारी पहाटे देशभरात छापेमारी केली. झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) आणि त्यांच्याशी संबंधित 20 ठिकाणी ईडीने छापेमारी केली. या छापेमारीत मोठं घबाड मिळालं आहे. पूजा सिंघल यांच्या जवळच्या CA च्या घरात तब्बल 17 कोटी रुपये रोख आणि 8 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही रक्कम पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चक्क पैसे मोजायचं मशीनच आणलं. दरम्यान, रोख रक्कम मिळाल्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून (ED Officers) अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना बिहारमधील मधुबनीमधून अटक करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या पथकानं झारखंडमधील रांची, धनबाद, खुंटी, राजस्थानमधील जयपूर, हरियाणातील फरिदाबाद आणि गुरुग्राम, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बिहारमधील मुझफ्फरपूर आणि दिल्ली-एनसीआरमध्ये एकाचवेळी छापे टाकले होते. त्यात रांचीमध्ये पंचवटी रेसिडेन्सी, चांदणी चौक, कानके रोड, हरिओम टॉवरमधील नवीन इमारत, लालपूर, पल्स रुग्णालय, बरियातू मधील ब्लॉक क्रमांक 9 चा समावेश आहे. पल्स रुग्णालय हे पूजा सिंघल यांचे पती आणि व्यापारी अभिषेक झा यांच्या मालकीचं आहे. IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापे टाकल्याची माहिती मिळतेय. या संपूर्ण प्रकरणावर ईडीकडून काय अधिकृत माहिती देण्यात येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Jharkhand : ₹ 17 crore found from IAS Puja Singhal. Raid by ED pic.twitter.com/I1XYC9XT3H
— Live Adalat (@LiveAdalat) May 6, 2022
महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्या घरी 17 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली ते CA सुमन कुमार यांनी 17 कोटी रुपये हे त्यांच्या मालकीचे असल्याचं सांगत ते पुढील आर्थिक वर्षात दाखवायचे होते असं म्हटलंय. मात्र, इतकी मोठी रक्कम कुठून आली आणि ती घरात का ठेवली? याचं उत्तर त्यांना देता आलं नाही.
ED recovered Rs 19.31 crores of cash in the raids conducted today at several locations linked to IAS Pooja Singhal. It conducted raids at including Ranchi, Mumbai, Delhi, and Jaipur: Officials
— ANI (@ANI) May 6, 2022
IAS पूजा सिंघल यांचे पती अभिषेक यांच्या घरावरही छापेमारी सुरु आहे. IAS अधिकारी राहुल पुरवार यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पूजा सिंघल यांनी अभिषेक यांच्यासोबत लग्न केलं होतं. ईडीचं पथक अभिषेक यांच्या रातू रोडवरील घरीही तपास करत आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आतापर्यंत काहींना अटक केल्याचीही माहिती मिळतेय.