नवी दिल्ली : आगीत एका मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. मृ्त्यूपुर्वी मुलीने दिलेल्या केलेलं शेवटचं वक्तव्य असं होतं की, माझ्या सारखाचं आरोपीचा तडफडून मृत्यू झाला पाहिजे. झारखंडमध्ये (Jharkhand) एका मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आलं होतं. त्यानंतर लागलेल्या आगीत मुलगी प्रचंड भाजली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं त्यांच्यावरती उपचार सुरु होते. ज्यावेळी मुलीने आरोपींची नावे पोलिसांना (Police) सांगितली. त्यावेळी त्यांचा सुद्धा असं तडफडत मृत्यू झाला पाहिजे असं पोलिसांनी सांगितलं. तरुणीचे शब्द ऐकून पोलिस देखील चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
अंकिता सिंग असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. अंकिता तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे व्हिडीओत सांगत आहे. त्या व्हिडीओमध्ये अंकिताने शेवटचे शब्द उच्चारले आहेत. त्यामध्ये तिने आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे. “सोमवारी रात्री आम्ही पापा यांना शाहरुख या मुलाची माहिती दिली. अंकिताच्या वडिलांनी आपण याबाबत सकाळी बघून घेऊ असं म्हटलं. त्यानंतर दोन आरोपींनी सकाळी अंकिताच्या घराच्या खिडकीतून पेट्रोल टाकले आणि पेटवून देऊन पळ काढला. आरोपीची नावे शाहरुख खान आणि छोटू खान अशी आहेत. झालेल्या घटनेनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ज्यावेळी अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकलं होतं. त्यावेळी त्यांच्या घरात आगीचा भडाका उडाला होता. तिथं असलेल्या लोकांनी तात्काळ ते विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु अंकिताने आरोपींना पाहिले होते. अंकिता 90 टक्के भाजली असल्याने तिचा झारखंड मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं तिचा मृत्य झाला आहे. ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यावेळी काही हिंदू संघटनांनी आंदोलन केल्याची माहिती मिळाली आहे.