हावडा मुंबई एक्सप्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या अनेक ट्रेन रद्द, पाहा संपूर्ण यादी

| Updated on: Jul 30, 2024 | 3:54 PM

तसेच या अपघातामुळे उपनगरीय गाड्याही उशिराने धावत आहेत. अनेक गाड्यांना या अपघाताचा फटका बसला आहे.

हावडा मुंबई एक्सप्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या अनेक ट्रेन रद्द, पाहा संपूर्ण यादी
Follow us on

Howrah Mumbai Mail Express Accident : हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. झारखंडमधील चक्रधरपूर या ठिकाणी आज (30 जुलै) पहाटे भीषण रेल्वे अपघात घडला. गाडी क्रमांक 12810 हावडा-सीएसएमटी एक्सप्रेसचे चक्रधरपूरजवळ 18 डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाकडून रुळावर घसरलेले डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या रेल्वे अपघातामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

हेल्पलाईन क्रमांक जारी

हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसच्या अपघातानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने एक हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. यात जखमी झाल ज्यामध्ये टाटानगर 06572290324, चक्रधरपूर 06587 238072, राउरकेला 06612501072/ 06612500244, हावडा 9433357920/ 03326382217, CSMT हेल्पलाइन ऑटो क्रमांक: 55993, P&T: 022-22694040, मुंबई: 022-22694040 आणि नागपूर: 7757912790 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

अनेक एक्सप्रेस रद्द

हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसच्या अपघानानंतर छत्तीसगडच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर सात रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच रायपूरकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत येतील.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर टाटानगर इटावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच बिलासपूर टाटानगर एक्सप्रेस ही राउरकेलापर्यंत धावणार आहे. तर एर्नाकुलम टाटानगर एक्सप्रेस ही चक्राधरपूरपर्यंत असेल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच या अपघातामुळे उपनगरीय गाड्याही उशिराने धावत आहेत. अनेक गाड्यांना या अपघाताचा फटका बसला आहे.

नेमकं काय घडलं?

काल रात्रीच्या सुमारास राजखरसावां जंक्शनमधून हावडा मुंबई एक्सप्रेस निघाली. सकाळी पावणेचारच्या सुमारास रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. तसेच जखमींच्या मदतीसाठी आणि प्रवाशांना उपचारांसाठी चक्रधरपूर रेल्वे रुग्णालय व खरसावनच्या शासकीय आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? या गोष्टींचा तपास केला जात आहे.