नवी दिल्लीः काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडून ज्या गुलाम नबी आझादांनी (Gulab Nabi Azad) नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे. त्याबद्दल दहशतवादी संघटनेकडून म्हटले आहे की, जम्मू काश्मिरच्या राजकारणात आझादांची एंट्री अचानक झाली नाही, तर ती जाणीवपूर्वक आणि विचार करुन त्यांनी राजकारणात आता सहभाग घेतला आहे, आणि हे त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला होता.
आझादांच्या नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात होण्याआधी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्याबरोबर बंद खोलीत बैठक घेण्यात आली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबतही बैठक केली होती.
त्यामुळे दहशतवादी संघटनेकडून जे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपकडून आपल्या राजकीय अजेंड्यासाठी विस्थापित काश्मिरी पंडितांचा वापर केला जात असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे.
काँग्रेस पक्षातून बाहेर पडून गुलाम नबी आझादांनी नवीन नव्या पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, आपला राजकीय पक्ष जम्मू काश्मिरीच्या राजकारणावरच आधारित असणार आहे.
त्यानंतर त्यांनी बारामुलापासून मिशन काश्मिरलाही सुरुवात केली होती. त्यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीवेळी बोलाताना त्यांनी कलम 370 बाबतही मोठी गोष्ट सांगितली होती.
यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, माझ्यावर आरोप केला जात आहे की मी विरोधी पक्षनेता असल्याने कलम 370 परत लागू करू शकत नाही, मात्र हे ही लक्षात घेतले पाहिजे की,मला संसदेत संख्याबळ कुठून मिळणार? असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. माझ्या राजकीय फायद्यासाठी मी नागरिकांना कधीच मूर्ख बनवत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर सांगितले होते की, त्यांच्या पक्षाची विचारधारा ही स्वतंत्र असणार आहे. तसेच केंद्र शासित प्रदेश बनण्याअगोदरपासून जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री राहिलेले गुलाम नबी आझादांनी आपल्या नव्या पक्षाची विचारधारा स्पष्ट केली होती.
जम्मू काश्मिरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच येथील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाऊन येथील नागरिकांना येथील जमिनीचा अधिकार देण्यासाठीचा संघर्ष हा चालूच ठेवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.