नवी दिल्ली: दिल्लीत कोरोनाची साथ ओसरल्यानंतर आता शाळा आणि महाविद्यालये हळूहळू सुरु होत आहेत. दिल्लीतील नामवंत जवाहरलाल नेहरू विद्यापीठही (JNU) लवकरच सुरु होणार आहे. येत्या 8 तारखेपासून जेएनयू कॅम्पस (JNU Campus Reopening) उघडले जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश दिला जाईल. कोरोनाच्या साथीमुळे मार्च 2020 पासून जेएनयू विद्यापीठ बंद होते. (JNU will be reopen soon)
जेएनयू प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार MTech, M.Phil. आणि MBA च्या विद्यार्थ्यांनाच तुर्तास विद्यापीठात प्रवेश मिळेल. याशिवाय, जेएनयूमधील वसतीगृह देखील सुरु केले जाणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जेएनयू प्रशासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपूर्वी आपले शोध प्रबंध सादर करायचे आहेत. या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा सुरु होतील. तसेच सेंट्रल लायब्ररीही सुरु होणार असून एकावेळी पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तर रिडींग रूम, बुकशेल्व आणि रिडींग हॉल बंद ठेवण्यात येणार आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशिवाय NCC च्या मुलींना विद्यापीठात प्रवेश मिळेल. कारण बी सर्टिफिकेटसाठी त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती महत्त्वाची आहे. याशिवाय, विद्यापीठाच्या आवारात आता ई-ऑटोरिक्षा सुरु करण्यात येणार आहेत.
जेएनयूतील क्रीडा संकुलही उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडुंच्या कोट्यातील विद्यार्थ्यांना जेएनयूमध्ये प्रवेश मिळेल. याशिवाय, अरावली गेस्ट हाऊस आणि इंडिया कॉफी हाऊस कँटीनही उघडण्यात येणार आहे. जेणेकरून वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होईल.
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी
पंजाबमध्ये तुफान राडा, वीटा आणि दगडांचा मारा, अकाली दलाच्या अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला
या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा
(JNU will be reopen soon)