सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप लावला, आणि आता.. – सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे शंकराचार्य भडकले

| Updated on: Dec 23, 2024 | 9:54 AM

यापूर्वी हिंदू समाजावर अनेक अत्याचार झाले असून हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि जतन करायचे असेल, तर त्यात गैर काय? असा सवाल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विचारला.

सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप लावला, आणि आता.. - सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे शंकराचार्य भडकले
Follow us on

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीकेचा आसूड ओढला. त्यांनी राजकीय सोयीनुसार विधानं केल्याचा आरोपही लावला. जेव्हा सत्ता
हवी होती तेव्हा त्यांनी ( सरसंघचालक) मंदिर-मंदिर करत त्या नावाचा जप चालवला होता आणि आता सत्तेत आल्यावर ते मंदिर शोधू नका असा सल्ला देत आहेत .

उठसूट रोज मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारहार्य नसल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं, त्यांच्या याचा विधानाचा दाखल देत शंकराचार्यांनी मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडलं. राजकीय सोयीनुसार त्यांनी विधानं केली असा आरोपही शंकराचार्य यांनी केला.

बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानावरूनही टीकास्त्र

हे सुद्धा वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधआन केलं त्यावरही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी टीकास्त्र सोडलं. संसदेच्या परिसरात झालेल्या हाणामारीच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा बचाव केला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आंबेडकरांवर केलेले वक्तव्य यामुळे हे झाल्याचा दावा शंकराचार्यांनी केला.

बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचाराची निंदा

या देशात बाबासाहेबांच्या विचारसरणीवर चालणारे लोक जास्त आहेत, त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत आहेत, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कठोर कारवाई करत भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवलं पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचाही निषेध केला. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात केंद्र सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याच्या मुद्यावरही त्यांनी निशाणा साधला.

भूतकाळात काही आक्रमकांनी कथितपणे उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करून ( त्यांचे) पुरातत्व सर्वेक्षण करावे, अशी मागणीही शंकराचार्यांनी केली. यापूर्वी हिंदू समाजावर अनेक अत्याचार झाले असून हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि जतन करायचे असेल, तर त्यात गैर काय? असा सवाल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला.