चंदिगढ : हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये 17 वर्षांच्या कबड्डीपटूवर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने कैरू पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध तोशाम पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच प्रवास करणाऱ्या महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Kabaddi girl abused in toilet of moving train in Haryana)
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा पीडित मुलीला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचाही आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कैरू पोलीस चौकीत दिलेल्या तक्रारीत तसा आरोप करण्यात आला आहे. पीडितेची आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, तिची मोठी मुलगी बारावीत शिकते व ती कबड्डीची खेळाडू आहे. कबड्डीच्या तयारीसाठी अकादमीत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फेब्रुवारी महिन्यात मुलीला इंदूरला नेले होते. मुलीला अकादमीचे वातावरण आवडत नसल्याने दोघेही दिल्लीला ट्रेनने गावी परतत होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरोपीने मुलीला काही नशेचे पदार्थ पाजले आणि नंतर चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये तिच्यावर बलात्कार केला.
महिलेचा आरोप आहे की, आरोपीने मुलीला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. बरीच चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कैरू पोलीस चौकीत तक्रार दिली. याप्रकरणी तोशाम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तपास करत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशीही आरोपीने संगनमत केल्याचे बोलले जात आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे. 19 एप्रिल रोजी आरोपी तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे तोशाम पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सुखबीर जाखर यांनी सांगितले. (Kabaddi girl abused in toilet of moving train in Haryana)
इतर बातम्या
Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात