बेळगाव : कर्नाटक राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहिर झाल्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता सीमाभागातील मराठी माणसांच्या महाराष्ट्रात जाण्याच्या आशा आकांक्षाही वाढल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय पक्षाचे नेते आता मराठी उमेदवारांविरोधातच आपल्या पक्षासाठी सीमाभागात आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आता सीमाभागातील मराठी माणसांनी राज्यातील नेत्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी त्यांनी रोड शो केला आहे. त्याच बरोबर त्यांची मोठ्या गर्दीत जाहिर सभाही झाली आहे.
त्यामुळे उद्या होणाऱ्या भाजपच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात जोरदार वारे फिरले आहे.
आजच्या झालेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही जोरदार हल्लाबोल केला आहे.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहिर झाल्यापासून महाराष्ट्रातीले नेतेही आता कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काही नेते राज्यात युती आणि आघाडीत असतानाही राज्याची निवडणूक असल्याने आता आपापल्याच पक्षाविरोधात उमेदवार लढत आहेत.
त्याचमुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाण आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
बेळगामध्ये खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर त्यांनी बेळगावमधूनच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
त्यामुळे त्याच सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटल्याने आता राज्यासह कर्नाटकातीलही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सायंकाळी बेळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. मात्र आता महाराष्ट्र एकीकरण समितीकडून देवेंद्र फडणवीस यांना सभास्थळी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांच्या जाहिर सभेनंतर समितीने व्यासपीठावर ही घोषणा केली आहे.