सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यासह 8 आमदार घेणार पद आणि गोपनियतेची शपथ

| Updated on: May 20, 2023 | 11:27 AM

कर्नाटकात आमदार घेणार शपथ घेणार पद आणि गोपनियतेची शपथ; वाचा कोण कोण असणार सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात

सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यासह 8 आमदार घेणार पद आणि गोपनियतेची शपथ
Follow us on

बंगळुरु: कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यानंतर आता सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी 12:30 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. बंगळुरुमधल्या कांतेराव स्टेडियमवर हा सोहळा पार पडणार आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी के शिव कुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

कोण कोण शपथ घेणार?

आज काँग्रेसचे 10 आमदार पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत.

1. सिद्धरामय्या

2. डी के शिवकुमार

3. डॉ. जी परमेश्वरा

4. के एच मुनीयाप्पा

5. के जे जॉर्ज

6. एम बी पाटील

7. सतिश जारकिहोळी

8. प्रियांक खर्गे

9. रामलिंगा रेड्डी

10. बी झेड जमीर अहमद खान

सिद्धरामय्या डी के शिव कुमार सह 8 जण शपथ घेणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

कर्नाटकातील शपथविधीपूर्वी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या भेटीचा फोटो काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे.

 

सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती महाविकास आघाडीत चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याला ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई किंवा प्रियंका चतुर्वेदी उपस्थित रहातील असं सांगण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोहळ्याला उपस्थित राहावं, यासाठी केंद्रातील तसंच राज्यातील काँग्रेस नेते आग्रही होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्धव ठाकरे यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं.कर्नाटक महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे. कर्नाटक निकालांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणण्याची दाट शक्यता आहे. भाजपचाही महाराष्ट्रात पराभव होणार अशी भूमिका उद्धव ठाकरे सतत मांडत आहेत. उद्धव ठाकरे हे सोहळ्यास उपस्थित राहिल्यास विरोधी पक्षाची एकजूटीबाबत अधिक स्पष्टता झाली असती, असं काँग्रेस नेत्यांचं मत आहे.