Karnataka Election Result 2023 : भाजपासाठी बंद झाले दक्षिणेचे द्वार ?, आता या राज्यातून प्रवेशाचा प्रयत्न

| Updated on: May 13, 2023 | 1:57 PM

कर्नाटकाला दक्षिणेचे प्रवेशद्वार मानले जाते. या राज्यात पराभव जिव्हारी लागल्याने आता दक्षिणेचे दरवाजे भाजपासाठी बंद झाले आहेत का ? भाजपाची कर्नाटकाशिवाय अन्य कोणत्याही राज्यात सत्ता नाही. आता या राज्यातून भाजपा नशिबाला पुन्हा साद घालणार आहे.

Karnataka Election Result 2023 : भाजपासाठी बंद झाले दक्षिणेचे द्वार ?, आता या राज्यातून प्रवेशाचा प्रयत्न
bjp-meeting
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : कर्नाटकात भाजपाचा मोठ्या पराभवाच्या दिशेने जात आहे. कॉंग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दुपारी बारापर्यंत कॉंग्रेस अर्ध्याहून अधिक जागांवर पुढे चालली होती. अनेक जागांवर तिचा विजय देखील झाला आहे. कॉंग्रेसला कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची गरज आहे. आणि या जागा तिला सहज मिळाल्या आहे. उलट कॉंग्रेस 130 जागांपुढे चालली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार आहे. दुसरीकडे भाजपाने दक्षिणेत प्रवेश करण्यासाठी कर्नाटकाची निवड केली होती. यंदा त्यांना या राज्यात पराजयाचा सामना करावा लागल्याने आता पार्टीने पुढचे डावपेच आखले आहेत.

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगना पाच प्रमुख दक्षिण भारतीय राज्य आहेत. कर्नाटकाला दक्षिणेचे प्रवेशद्वार मानले जाते. या राज्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागल्याने आता दक्षिणेचा भाजपासाठी बंद झाला आहे. भाजपाची कर्नाटकाशिवाय अन्य कोणत्याही राज्यात सत्ता नाही. कर्नाटकाशिवाय आता तेलंगाना एकमात्र असे राज्य आहे जेथे भाजपाला शिरकाव करण्याची संधी उरली आहे. कारण तेलंगणात भाजपाचे चार खासदार आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाची कोणतीत उपस्थिती नाही.

आता या राज्यातून करणार प्रवेश

भाजपाचा कर्नाटकात अनपेक्षित पराभव झाल्याने आता भाजपाला आपली स्टेटेजी बदलावी लागणार आहे. भाजपाचा मनसुबा कर्नाटकातून दक्षिणेत प्रवेश करण्याचा होता. परंतू येथे आलटून पालटून सरकार येत असते. कर्नाटकाती पराभवातून आता भाजपाने पुन्हा आपला फोकस दक्षिणेत शिरकाव करण्यावर केला आहे. आता जेथे निवडणूका होणार आहेत असे पुढचे दक्षिण भारतीय राज्य तेलंगणा आहे. तेलंगणात सध्या केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती ( BRS) सरकार आहे. भाजपाने येथे जोर लावला आहे. तसेच मोठ्या राजकीय शक्तीने मैदानात उतरणार आहे. तेलंगणा राज्यात येत्या डिसेंबरात निवडणूका होत आहेत.

धार्मिक राजकारण आणि राष्ट्रवाद उपयोगी येणार ?

तेलंगणात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारच्या विरोधात भाजपाने  लढा देत जमिन तयार केली आहे. याचा परीणाम काही विधानसभा पोट निवडणुकीत देखील दिसला आहे. त्याच बरोबर हैदराबादच्या 2020 च्या पालिका निवडणूका भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे असा सवाल केला जात आहे की कर्नाटक पराभवानंतरही भाजपा पुन्हा दक्षिण भारतात प्रवेश करेल का ? भाजपा आपल्या धार्मिक राजकारण आणि राष्ट्रवादाच्या जोरावर केसीआर यांच्या बाले किल्ल्याला भगदाड पाडू शकेल का ? असा सवाल केला जात आहे.

केसीआर यांची हॅट्रीक रोखणार 

केसीआर यांनी दोन वेळा तेलंगणात विजय मिळवला आहे. आणि आता तिसऱ्यांदा ते मोठा विजय मिळविण्याच्या तयारीत आहेत. केसीआर यांची हॅट्रीक भाजपा आता रोखणार का ? असा मोठा सवाल आहे. भाजपाकडे या महत्वपूर्ण लढाईसाठी मजबूत राजकीय मुद्दे आहेत का ? दक्षिणेतील प्रांतिक पक्षांच्या अस्मितेवर भाजपाकडे उत्तर आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे डीसेंबर महिन्यातील निवडणूकांमध्ये मिळणार आहेत.