कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा ( B S Yediyurappa) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश होता होता थोडाक्यात बचावलं. येडियुरप्पा ज्या हेलिकॉप्टरमध्ये बसले होते, ते कलबुर्गी येथे लँड होणार होते. मात्र ज्या ग्राउंडवर लँडिंग होणार होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. हेलिकॉप्टर जमिनीच्या दिशेने आलं तसं पात्यांच्या वाऱ्यामुळे जमिनीवरच्या प्लास्टिकच्या पिशव्या उडू लागल्या. यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात होणार होता. मात्र पायलटने वेळीच सतर्क राहून हेलिकॉप्टर हवेतच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मोठी दुर्घटना टळली.
#WATCH | Kalaburagi | A helicopter, carrying former Karnataka CM and senior leader BS Yediyurappa, faced difficulty in landing after the helipad ground filled with plastic sheets and waste around. pic.twitter.com/BJTAMT1lpr
— ANI (@ANI) March 6, 2023
संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. त्यात हेलिकॉप्टरसमोरील संकट स्पष्ट दिसतेय. हेलिपॅडच्या दिशेने हेलिकॉप्टर येते तेव्हा पात्यांच्या वाऱ्यामुळे अचानक जमिनीवरचा कचरा उडू लागतोय. त्यामुळे पायलटची व्हिजिबिलिटी कमी झाली. प्लास्टिकच्या पॉलिथिन हेलिकॉप्टर भोवती फिरू लागल्या. अशा स्थितीत लँडिंग झाली असती तर दुर्घटना घडली असती. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.
कर्नाटक येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारही जोरात सुरु आङे. भारतीय जनता पार्टीच्या एका प्रचार सभेकरिता बी एस येडियुरप्पा कलबुर्गी येथे आले होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा सुरु आहेत. अशाच एका सभेसाठी येडियुरप्पा कलबुर्गी येथे आले होते. कर्नाटकात येत्या मे महिन्यापूर्वी विधासभांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१८ मध्ये कर्नाटकातील २२४ मतदार संघांत निवडणूका झाल्या. यात ११४ हा जादुई आकडा पार परायचा होता. भाजपने १०४ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली होती.