बंगळुरू : सांस्कृतिक मंत्रालयाकडून कर्नाटकातील हम्पीमध्ये (Humpy) दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘देवायतनम – भारतीय मंदिर वास्तूकलेची एक ओडिसी’ हे संमेलन केंद्राच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून आयोजित करण्यात आलंय. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. संमेलनात संस्कृती आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्नाटकचे पर्यटनमंत्री आनंद सिंह, परिवहन मंत्री बी श्रीरामुलु, बेल्लारीचे आमदार सोमशेखर रेड्डी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक वी. विद्यावती सहभागी झाले होते. तर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी पूर्व रेकॉर्ड केलेला संदेश यावेळी दिला.
मंदिरं हे भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचं प्रतिक आहेत. देशातील समृद्ध मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक इतिहास जपण्याची गरज आहे, असं मत मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच हे संमेलन भारतीय मंदिर, कला आणि वास्तुकलेची भव्यता यवर चर्चा, विचारविनिमय आणि जगभरात या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे, असंही रेड्डी म्हणाले. त्याचबरोबर रेड्डी पुढे म्हणाले की, हे संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समग्र दृष्टीकोनाशी अनुरुप आहे. जे आपल्याला पाच ‘वि’ सोबत प्रेरित करतं. त्यात विकास, वारसा, विश्वास, विज्ञान आपल्याला विश्वगुरु बनण्याकडे घेऊन जातो, जेणेकरुन भारत जगाला मार्ग दाखवू शकेल.
Flagged off the Information Van on #JalJeevanMission and Mission Indradhanush 4.0 at #Hampi today.
Minister for Transport Sri @sriramulubjp avare, Minister for Tourism Sri Anand Singh avare, Govt of Karnataka, MLA Sri @GSReddyBJP avare were also present. pic.twitter.com/euZ1nfiivI
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) February 25, 2022
जी. किशन रेड्डी ये पाच ‘वि’चा उल्लेख करुन थांबले नाहीत तर त्यांनी त्याबाबत सविस्तर माहितीही दिली. केंद्र सरकारचे विकासाचे प्रयत्न गरीबातील गरीबापर्यंत पोहोचतील. आमचा अद्भुत वारसा भावी पिढ्यांना उपलब्ध होण्यासाठी त्याचे संरक्षण, जतन आणि प्रसार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार विश्वासानं काम करतं आणि आपल्या नागरिकांचा आणि जगाचा विश्वास जिंकतं. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपण आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत आहोत, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला. तसंच आपला जुना आणि पारंपरिक वारसा, ज्ञान, आत्मविश्वास आणि समृद्ध नागरिकांचे भंडार असलेला भारत विश्वगुरू बनण्यासाठी समर्पित भावनेनं आणि एकजुटीनं काम करत आहे, असंही रेड्डी यांनी म्हटलंय.
रेड्डी पुढे म्हणाले की, या भूमीतील मंदिरांकडे अनेक आयामांच्या माध्यमातून पाहिलं जावं. कारण, ही मंदिरं आत्म्याला आध्यात्मिक कल्याण, शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, स्थानिक समाजघटकांना आर्थिक संधी, शिल्पकार, कलाकार आणि कारागिरांना एक रचनात्मक मार्ग प्रदान करतो. हिंदू मंदिरे ही कला आणि विज्ञानाचे एक संयोजन असून त्यात शिल्पशास्त्र, वास्तू शास्त्र, ज्यामिति आणि समरुपता समाविष्ट आहे. मंदिरे ही एकता, अखंडता आणि सभ्यतेचं प्रतिक आहेत.
Delighted to have inaugurated the International Conference #Devayatanam on Temple Architecture at World Heritage Site #Hampi in Karnataka.
This event will be an endeavor to
?Discuss
?Deliberate
?Disseminate
the science & the art behind Temple Architecture.#AmritMahotsav pic.twitter.com/4oodnCMrKo— G Kishan Reddy (@kishanreddybjp) February 25, 2022
हम्पीचे मंदिर जे सुरुवातीपासूनच आपली प्रतिभा, कल्पनेचा विस्तार आणि वास्तुकलेसाठी UNESCO च्या यादीत सहभागी आहेत. UNESCO च्या भारतातील 40 जागतिक वारसा शिलालेखांपैकी अंदाजे 10 हिंदू मंदिरे ही वास्तुकला, नमुने आणि समरुपतेत सहभागी असल्याचंही रेड्डी यांनी यावेळी सांगितलं.
यावर्षी केंद्र सरकारनं बेलूर आणि सोमनाथपूरची होयसाळ मंदिरे UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर भारत अनेक मंदिरांची पुनर्बांधणी करत असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या भव्य मंदिराचाही उल्लेख केला. तसंच जवळपास अडीचशे वर्षानंतर भारताची अध्यात्मिक राजधानी असेल्या काशीतील मंदिरांचा पुनर्विकास करण्यात आला. तिथे येणाऱ्या भाविकांना चांगला पायाभूत सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
तेलंगणा राज्याने दोन मोठ्या दगडापासून कोरीव नक्षीकाम असलेल्या मंदिराची निर्मिती केली आहे. त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. चांगल्या पायाभूत आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असणारी आध्यात्मिक स्थळं भाविकांना उपलब्ध करुन देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं यावेळी रेड्डी यांनी सांगितलं.
त्याचबरोबर पर्यटन मंत्रालयाकडून भाविकांना आध्यात्मिक स्थळांवर प्रसाद आणि स्वदेश दर्शन योजनेद्वारे उत्तम सुविधा आणि अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी 7 हजार कोटी रुपयांचे बजेट असेल. या कार्यक्रमात जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते मंदिरांची माहिती देणाऱ्या एका पुस्तिकेचंही प्रकाशन करण्यात आलं.
इतर बातम्या :