बंगळुरु: कर्नाटक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Karnataka Gram Panchyat Election Result) बुधवारी जाहीर होणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटकमधील 5,728 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले होते. दोन टप्प्यात मिळून 72, 616 जागांसाठी 81 टक्के मतदान झाले होते. 8074 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. (Karnataka Gram Panchyat Election Result 2020 updates)
आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या सत्रात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेस आणि जनता दलाचे (सेक्युलर) आव्हान होते. भाजपने कर्नाटकमध्ये 80 टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप 3,430 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस व जनता दलाने अनुक्रमे 1585 आणि 595 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे तुर्तास या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
बेळगावीच्या चिक्कोडी मतमोजणी केंद्रावर काळी जादू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी याठिकाणहून एक छोटा कागद आणि अन्य सामुग्री जप्त केली.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Karnataka: Counting of votes cast in Local Body elections underway in Davanagere pic.twitter.com/laa0iUabf7
— ANI (@ANI) December 30, 2020
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
नवा जीआर जारी, ग्राम पंचायत सदस्य होण्यासाठी ‘ही’ अट लागू
(Karnataka Gram Panchyat Election Result updates)