कर्नाटकचे बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी या विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar accident) या बेंगळुरूहून बेळगावला येत होत्या. त्यावेळी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टीजवळ रस्त्यावर अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रं आडवं आलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कारची झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठिला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं. त्यामुळे त्यांना तात्काल रवी पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. लक्ष्मी यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे देखील कारमध्ये होते. सुदैवाने चन्नराज यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
सुदैवाने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी या अपघातातून बचावले आहेत. मात्र कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ रवी पाटील यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले आहे. हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले असून चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळीच्या यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
लक्ष्मी या टोयोटा इनोव्हातून जात होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. कारचा संपूर्ण चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर एमयूव्हीच्या सर्व सहा एअर बॅगा उघडल्या होत्या. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.