कर्नाटकात पावसाचा कहर; पाण्यात कार अडकली आणि महिला अभियंता हाकनाक गेली…

| Updated on: May 21, 2023 | 9:31 PM

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसामुळे वातावरण प्रचंड खराब होते. त्यामुळे दिवसभर पाऊस पडत असून रात्रीही बेंगळुरूमध्ये पाऊस कोसळत आहे.

कर्नाटकात पावसाचा कहर; पाण्यात कार अडकली आणि महिला अभियंता हाकनाक गेली...
Follow us on

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. बेंगळुरूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कार पाण्यात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 5 लाखांची भरपाईही जाहीर केली आहे. आज बंगळुरूमध्ये सुमारे तासभर गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शहरासह परिसरातील लोकांच्या जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आर सर्कलजवळ बांधलेला भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला होता. भुयारी मार्गात पाणी साचले होते, तरीही एका टॅक्सी चालकाने त्या तुंबलेल्या पाण्यात टॅक्सी आत घेऊन गेला, त्यामुळे टॅक्सी त्या तुंबलेल्या पाण्यात अडकली.

त्यावेळी टॅक्सीमध्ये चालकासह 7 जण आता होते. त्यावेळी नागरिकांच्या मदतीने कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर कारमधील प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्या आले. या सात प्रवाशांपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 22 वर्षीय महिलेचे नाव भानू रेखा आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात जाऊन महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

 

हे कुटुंब विजयवाडा येथील रहिवासी असून ते बंगळुरूला भेट देण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या महिलेच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत महिलेच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसामुळे वातावरण प्रचंड खराब होते. त्यामुळे दिवसभर पाऊस पडत असून रात्रीही बेंगळुरूमध्ये पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून रविवार असल्याने आज वाहनांची वर्दळ नव्हती. आज सुट्टी नसती तर शहरभर वाहनांची कोंडी झाली असती.