Quran World Record : 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

| Updated on: Aug 08, 2022 | 10:49 AM

व्हिडिओमध्ये मुस्तफाचा रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. मुस्तफा हा कॅलिग्राफर असून त्याने हे काम 7 महिन्यांत पूर्ण केले आहे. लिंकन बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांचा हा पराक्रम जागतिक विक्रम मानला आहे.

Quran World Record : 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल
500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली – जेव्हा लोक अनोखे पराक्रम करण्यासाठी जन्माला येतात. तेव्हा त्यांचा विश्‍वास केवळ विश्वविक्रमावरच असतो. जेव्हा एखादी व्यक्ती खरी निष्ठेने आणि समर्पणाने काम करते. तेव्हा तो काहीही साध्य करू शकतो. काश्मीरमधील (Kashmir) एका व्यक्तीने देखील आपल्या निष्ठेने एक अनोखा पराक्रम केला आहे. त्याने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून जागतिक विक्रम मोडला आहे. त्यामुळे त्या काश्मीरी व्यक्तीची चर्चा अधिक आहे. त्याने जेव्हापासून हा पराक्रम केला आहे. तेव्हापासून लोकांनी त्याचं सोशल मीडियावर (Social Media) कौतुक करायला सुरुवात केली आहे. त्याचं वय 27 वर्ष असून इतक्या लहान वयातं त्याची कामगिरी पाहून अनेकांची आश्चर्य देखील व्यक्त केले आहे. जागतिक विश्वविक्रम (World Record) करण्यासाठी आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत. परंतु ते क्विचत लोकांना शक्य झाले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काश्मीरमधील बांदीपोरा येथे राहणाऱ्या 27 वर्षीय मुस्तफा-इब्न-जमीलने एक अनोखा विक्रम केला आहे. अथक परिश्रमाने स्वतःचे आणि देशाचे नाव रोशन करून त्यांनी विश्वविक्रम केला आहे. मुस्तफाने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून हा विक्रम केला आहे. अशी माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे. तरुणाचे अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

7 महिने, 18 तास कामाचा रेकॉर्ड

व्हिडिओमध्ये मुस्तफाचा रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. मुस्तफा हा कॅलिग्राफर असून त्याने हे काम 7 महिन्यांत पूर्ण केले आहे. लिंकन बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांचा हा पराक्रम जागतिक विक्रम मानला आहे. तसेच त्यासाठी त्यांना बक्षीसही दिले आहे. मुस्तफाने 14.5 इंच रुंद आणि 500 ​​मीटर लांब कागदावर कुराण लिहिले आहे. इतकंच नाही तर ट्विटर व्हिडिओनुसार, तो रोज 18 तास कागदावर कुराण लिहायचा. मुस्तफाने सांगितले की त्याने आपले हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी सुरू केली. कॅलिग्राफी शिकत असताना ते आपली स्वाक्षरी करून कुराणातील आयते लिहीत असत. मग त्याने विचार केला की आपण संपूर्ण कुराण लिहून काढावे अशी माहिती त्याने मुलाखतीत एका वेबसाईटतला दिली आहे.