केरळ | 2 ऑगस्ट 2023 : केरळ राज्यातील मलाप्पुरम जिल्ह्यातील पराप्पानांगडी पालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मान्सून बंपर लॉटरीत तब्बल दहा कोटीचं बक्षिस लागलं आहे. केरळ राज्याची ही लॉटरी लागल्यानंतर या स्वच्छता कर्मचाऱ्याचं भाग्यच उजळलं आहे. इतके पैसे प्रत्येकीला मिळणार असले तरी त्यांनी हे स्वच्छतेचे काम यापुढेही करीत राहण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हरिथा कर्मा सेना या पराप्पानांगडी पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना ही राज्य सरकारीची मान्सून बंपर लॉटरी लागली आहे. काही दिवसांपूर्वी, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील पराप्पानांगडी येथील स्वच्छता कर्मचारी राधा हीने तिच्या काही सहकाऱ्यांना आपण लॉटरीचे तिकीट काढूया का ? अशी विचारणा केली होती. केरळ सरकारचे मान्सून बंपर लॉटरीत 10 कोटी रुपयांचे रोख बक्षीस असल्याने त्यांनी लॉटरीचे तिकीट काढण्याचे ठरविले. परंतू राधा हीच्याकडे अडीचशे रुपये नसल्याने तिने मैत्रिणीची मदत मागितली. त्यानंतर अकरा मैत्रीणींनी एकत्र वर्गणी काढून लॉटरीचे तिकीट विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यातील नऊ जणींनी प्रत्येकी 25 रुपये तर दोन जणींनी प्रत्येकी 12.50 रुपये दिले. त्यानंतर लॉटरी एजंटकडून त्यांनी अडीचशे रुपयाचं तिकीट काढले. त्यानंतर त्यांना 27 जुलै रोजी त्यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षिस जिंकले असल्याचा कॉल आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिलांनी विकत घेतलेली चौथी बंपर लॉटरी आहे. गेल्यावर्षी ओनम बंपर लॉटरीत त्यांना एक हजार रुपायाचं बक्षिस लागले होते. कुट्टीमलू आणि बेबी या दोघींनी तिकीटासाठी प्रत्येकी 12.50 रुपये द्यायचे होते. कु्ट्टीमलूनेच माझे पैसे दिले. आम्ही दोघी नातलग आहोत. माझ्याकडे माझा पगार झाल्यावरच पैसे येतात. म्हणून नंतर तिला 12.50 रुपये देणार आहे. आम्ही केक विकत घ्यायचा असला तरी एक विकत घेतो. कारण पैसे नसतात. मग वाटून खातो असे बेबी हीने सांगितले.
या महिलांना सरकारचा टॅक्स कापून प्रत्येकी 63.6 लाख रुपये मिळतील, परंतू तरीही त्यांनी त्यांचा स्वच्छता कर्मचारी हा पेशा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ते पराप्पनांगडी स्वच्छ करीतच राहणार आहेत. केरळच्या मलाप्पुरम जिल्ह्यातील पराप्पनांगडी ही स्वच्छ पालिका म्हणून गौरविली जाते. हे स्टेटस कायम राहण्यासाठी आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करीतच रहाणार असल्याचे या महिलांनी म्हटले आहे.
आता आम्हाला वाटतं इतरांनी लॉटरी जिंकावी, असेही त्या म्हणाल्या. लॉटरी जिंकल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हा प्रत्येकीचा वेगळा संघर्ष आहे. आता एकीने तिच्या मुलीला गमविले आहे. तरी दुसरीचे घरी दुरुस्त करायचे आहे.तरी दोघी आजारातून बाहेर येत आहेत असे त्या म्हणाल्या