नवी दिल्लीः केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, ज्याचा भारतात जन्म झाला आहे, ज्याने भारतातील अन्न खाल्ले आहे. त्या सर्वांना हिंदू म्हणण्याचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटेल आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एका हिंदू परिषदेदरम्यान सांगितलेल्या शब्दांची आठवण करून देताना खान यांनी हे विधान केले.
त्यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या काही शब्दांची त्यांना आठवण झाली. ज्यांनी शतकापूर्वी स्वत:ला ‘हिंदू’ म्हणण्याचा आग्रह धरला होता.
हिंदू संमेलनात, राज्यपालांनी आर्य समाजाच्या बैठकीत सर सय्यद खान जे बोलले होते त्याचा संदर्भ देत त्यांनी हिंदूचा अर्थ सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनीही बोलताना ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असे म्हटले होते.
त्यांनी अलिगढ विद्यापीठाच्या संस्थापकाचे शब्द उद्धृत केले आहेत आणि, जो कोणी भारतात जन्माला आला आहे, जो कोणी भारतातील उत्पादित अन्नावर अवलंबून आहे.
जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असंही त्यांनी म्हटले होते.
यावेळी राज्यपाल यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी वसाहतवादी राजवटीत विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण केला तेव्हा आर्य समाजाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी आर्य समाजाच्या सदस्यांना सांगितले होते की ते त्यांना हिंदू का म्हणत नाहीत आणि ते ‘हिंदू’ शब्दाला धार्मिक शब्द मानत नाहीत. तर हिंदू या शब्दाला मी धार्मिक संज्ञा मानत नाही तर हिंदू ही भौगोलिक संज्ञा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.