Israel | भारतातील या शहराशी इस्रायलचे खास कनेक्शन, हमास युद्धानंतर केला संपर्क

| Updated on: Oct 19, 2023 | 6:10 PM

इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असताना इस्रायलच्या मुंबईतील प्रतिनिधीने भारतातील या शहराशी संपर्क करुन मोठी ऑर्डर दिली आहे. कोणते आहे ते शहर आणि काय दिली आहे ऑर्डर पाहा

Israel | भारतातील या शहराशी इस्रायलचे खास कनेक्शन, हमास युद्धानंतर केला संपर्क
israel police
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : हमास आणि इस्रायलचं युद्ध ( Israel Hamas War ) सुरु असताना इस्रायलने भारतातील एका सुशिक्षित शहराशी संपर्क करीत मोठी व्यावसायिक ऑर्डर दिली आहे. इस्रायल सारखा प्रगत देश आपल्या देशातील एका शहराशी कशाला संपर्क करेल असे तु्म्हाला वाट शकते. परंतू इस्रायलचे भारतातील या शहराशी अनोखे नाते आहे. त्यामुळे इस्रायलने या शहराशी संपर्क करीत नेमक काय मोठी ऑर्डर दिली आहे, हे पाहूयात…

देशाचे सर्वाधिक साक्षर राज्य असा नावलौकीक असलेल्या केरळ राज्यातील कन्नूर शहरातील एका फॅक्टरीचे इस्रायलशी अनोखे नाते आहे. कन्नूर शहरात इस्रायलच्या पोलिस दलाचा युनिफॉर्म शिवण्याचे काम केले जाते. हमास युद्धानंतर इस्रायल पोलिसांच्या युनिफॉर्मसाठी मोठी ऑर्डर आली असून या फॅक्टरीचे कर्मचारी हे युनिफॉर्म तयार करण्यासाठी जुंपले आहेत. कन्नूरच्या या फॅक्टरीचे नाव मारयान अप्रेरल प्रायव्हेट लिमिटेड आहे. केरळ शहराचा हॅंडलूम आणि टेक्सटाईल निर्यातीचा गौरवशाली इतिहास आहे. या फॅक्टरीत केवळ दोन खिशांचे इस्रायली पोलिसांचे शर्ट शिवले जात नसून त्या सोबत खांद्यावर लावला जाणारा ट्रेडमार्क देखील विणला जातो. या कंपनीचे मालक थॉमस ओलिकल असून त्यांच्या कंपनीत 1500 कर्मचारी काम करीत आहेत.

हमास युद्धानंतर अतिरिक्त ऑर्डर

थॉमस ओलिकल हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील थोडापुझा येथील रहीवासी आहे. ते मुंबईत रहातात. हमास युद्ध सुरु असतानाच इस्रायलच्या प्रतिनिधीने मुंबईत संपर्क करुन इस्रायल पोलिसांच्या युनिफॉर्मची अतिरिक्त ऑर्डर दिली आहे. मालाची पहिली ऑर्डर डिसेंबरला जाणार आहे. नवीन ऑर्डरमध्ये इस्रायली पोलिस शर्ट आणि कार्गो पॅंटच्या देखील समावेश आहे. ओलिकल यांनी सांगितले की दरवर्षी त्यांची फॅक्टरी इस्रायलला एक लाख युनिफॉर्म पाठवित असते. आम्हाला अभिमान आहे की जगातील महत्वाचे पोलिस दल आम्ही तयार केलेला युनिफॉर्म वापरतात.

2006 मध्ये स्थापन

केरळची ही फॅक्टरी साल 2006 मध्ये स्थापन झाली होती. पोलिस, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी युनिफॉर्म तयार करण्यात त्यांची खासीयत आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 1400 नागरिकांची हत्या केली. तर हमासवर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने मोठा हल्ला केल्याने आतापर्यंत 3500 जण ठार झाले आहेत.