मुंबई : शाळेत जात असलेल्या मुलांच्या जेवणाचे हाल होत असल्यामुळे आई परेशान होती. त्यामुळे पैसे कुणाकडे मागायचे अशी आईला शंका होती. परंतु आईने मुलांच्या शिक्षकाकडे (Teacher) 500 रुपयांची मागणी केली. पण त्यानंतर आईच्या खात्यावर 51 लाख रुपये जमा झाले. केरळ (Kerala) राज्यातील पलक्कड (palakkad) जिल्ह्यातील ही घटना आहे. पतीच्या निधनानंतर एकट्या महिलेवरती उपासमारीची वेळ आली होती.
त्या महिलेचं नाव सुभ्रदा आहे, त्या महिलेच्या पतीचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं आहे. घरात खायला काहीचं नसल्यामुळे सुभ्रदा यांनी गिरिजा हरिकुमार या शिक्षिकेकडे मदत मागितली. त्यानंतर शिक्षकांनी त्या महिलेचं तळमळ समजून घेतली.
शिक्षकांनी सुभ्रदा यांची ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यावर त्यांचा अकाऊंट नंबर सुद्धा शेअर केली. ती माहिती इतकी व्हायरल झाली की, त्यांच्या खात्यावर 51 लाख रुपये जमा झाले.
ज्यावेळी सुभद्रा यांनी गिरीजा या शिक्षिकेकडे फक्त 500 रुपये मागितले होते, त्यांनी सुभ्रदाला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर गिरीजा यांनी सांगितले की, मी काहीतरी करणार आहे. गिरीजा यांनी सुभ्रदा यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या घरी काहीचं नसल्याचं लक्षात आलं.
विशेष म्हणजे गिरीजा यांनी त्यांचं त्यांना राहिलेलं अर्धवट घर पुर्ण करायचं आहे असं लिहिलं होतं. दुसरं म्हणजे त्या मुलाचं शिक्षण त्यांना पुर्ण करायचं आहे असं नमूद केलं होतं.