मकर संक्रातीला पंतग उडवताय? पण ‘असं’ केल्याने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते माहितीये का? वाचा…

| Updated on: Jan 13, 2021 | 5:34 PM

जर तुम्हीही पंतग उडवण्याचा विचार करत असाल तर पंतग उडवणं भारतात गुन्हा असल्याचं तुम्हाला माहिती आहे का?

मकर संक्रातीला पंतग उडवताय? पण असं केल्याने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते माहितीये का? वाचा...
Follow us on

नवी दिल्ली : देशात मकर संक्रातीची जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. अनेक शहरांमध्ये मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडवला जातो. दिल्लीत लोक 15 ऑगस्टच्या दिवशीही पतंग उडवतात. मात्र, जर तुम्हीही पंतग उडवण्याचा विचार करत असाल तर पंतग उडवणं भारतात गुन्हा असल्याचं तुम्हाला माहिती आहे का? (Know all about Kite flying without permission is illegal in India Makar Sankranti 2021)

भारतात पतंग उडवणं हा गुन्हा आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा विश्वासही बसणार नाही, मात्र हे खरं आहे. भारतात पतंग उगडवणं बेकायदेशीर आहे. पतंगामुळे नेहमीच अपघात होऊन वाद होत राहतात. अनेकांना तर पतंगामुळे झालेल्या अपघातात आपला जीवही गमवावा लागलाय, तर अनेकजण जखमी होतात. हे झालं माणसांबाबत, पण पक्षांची जीवितहानीची तर मोजदादच नाही. मात्र, अनेकांना पतंग उडवणं बेकायदेशीर असल्याचीच माहिती नसते. म्हणूनच पंतग उडवण्याविषयीच्या कायद्याचा हा आढावा.

कायदा काय सांगतो?

भारतात इंडियन एअरक्राफ्ट कायद्यानुसार, पतंग उडवणे बेकायदेशीर आहे. जर तुम्हाला पतंग उडवायची असेल तर त्याआधी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. इंडियन एअरक्राफ्ट कायद्यानुसार, कोणतंही एअरक्राफ्ट उडवण्याआधी तुम्हाला परवानगी घेणं आवश्यक आहे. कायद्यानुसार, कोणतंही एअरक्राफ्ट किंवा हवेत उडणारं कोणतंही मशीन उडवण्यासाठी परवानगीची गरज असते.

या कायद्यात एअर शिप, पतंग, ग्लायडर्स, बलून आणि फ्लाईंग मशीनला एअरक्राफ्टच्या श्रेणीत टाकण्यात आलंय. यात पतंग उडवण्यासाठी देखील परवानगीची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जर या कायद्याचं उल्लंघन झालं तर आरोपीला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

या कायद्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रेम जोशी म्हणाले, “दिल्लीत मांझाचा उपयोग करुन पतंग उडवण्यावर बंदी आहे. दिल्लीत साध्या धाग्याचा उपयोग करुनच पतंग उडवावी लागते. या प्रकरणात एफआयआर देखील दाखल झालेली आहे. हा कायदा पर्यावरणाचा विचार करुन करण्यात आला होता. खरतंर असे अनेक कायदे आहेत ज्यांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणीच होत नाही. या कायद्यांना थेट कचऱ्याच्या टोपलीत टाकलं जातंय.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. टीव्ही 9 मराठीवर

जगभरात याबाबत काय कायदे?

भारतात याबाबत कायदा असला तरी मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. अनेक देशांमध्ये पतंग किती उंच उडवावी याचे नियम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना ठराविक उंचीवरच पतंग उडवावी लागते. अनेक देशांनी 150 मीटर, तर काही देशांनी 250 मीटर उंचीपर्यंत पतंग उडवण्याची मर्यादा केली आहे.

हेही वाचा :

बाईकस्वार 5 वर्षीय मुलीचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू

मकरसंक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या…

Know all about Kite flying without permission is illegal in India Makar Sankranti 2021