गाझा युद्धात शहीद झालेले वैभव काळे कोण होते?, कुटुंबीयांना धक्का; काय दिली माहिती?

| Updated on: May 17, 2024 | 10:51 AM

Col Waibhav Anil Kale : गाझाच्या राफा प्रदेशात झालेल्या हल्ल्यात निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला. ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत होते. राफा प्रदेशातून युनूस भागात हॉस्पिटलच्या वाहनातून प्रवास करताना झालेल्या हल्ल्यात ते शहीद झाले.

गाझा युद्धात शहीद झालेले वैभव काळे कोण होते?, कुटुंबीयांना धक्का; काय दिली माहिती?
Follow us on

Col Waibhav Anil Kale : गाझा येथील राफा भागात निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी वैभव अनिल काळे हे इस्रायलच्या हल्ल्यात शहीद झाले. हा हल्ला झाला तेव्हा वैभव काळे हे राफा प्रदेशातून युनूस भागात हॉस्पिटलच्या वाहनातून प्रवास करत होते. भारतीय लष्करातून निवृत्त झालेले वैभव अनिल काळे हे युनायटेड नेशन्सच्या राफा येथील युरोपियन हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या कामासाठी तैनात होते. ते संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून प्रवास करत होता, त्यादरम्यान इस्रायली हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. वैभव काळे यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संयुक्त राष्ट्र संघात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आणि काळे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

कोण होते वैभव काळे ? इंदूरशी नातं काय होतं ?

वैभव काळे यांचं इंदूरशी नातं होतं. त्यांनी येथील आयआयएममधून शिक्षण घेतलं होतं, तसेच आयआयएम लखनऊमध्येही ते शिकले. एवढंच नव्हे तर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बीए केलं होतं. 46 वर्षीय वैभव काळे हे भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत होते,  2022 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. आणि तीन आठवड्यांपूर्वीच त्यांनी संयुक्त राष्ट्रात सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

UN शी संलग्न होते वैभव काळे

कर्नल वैभव काळे यांनी भारतीय लष्करातून 2022 मधून VRS ( निवृत्ती) घेतली होती. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि सुरक्षा विभागात रुजू झाले होते. LinkedIn वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2000 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाला होते. 2009 ते 2010 सालापर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रात मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम केले. वैभव काळे यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून बिहेव्हिरल सायन्स आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यात पदवी घेतली.

भारतीय सैन्यात कधी झाले दाखल ?

वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. 1999 साली एनडीएमधून पासआऊट झाल्यानंतर 2000 साली ते भारतीय लष्करात झाले. लष्करात त्यांनी 22 वर्षांची सेवा बजावली. ते कर्नल पदावर कार्यरत होते आणि याच पदावरुन निवृत्त झाले होते. लष्करात कार्यरत असताना त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचीन, ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणूनही ते कांगोमध्ये कार्यरत होते. ईशान्य भारतात त्यांनी सेवा बजावली होती. पठाणकोट लष्करी तळावरच्या हल्ल्यावेळीही त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं. निवृत्तीनंतर मानव सेवा करण्याच्या उद्देशाने वैभव काळेंनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पसंती दर्शवली.

कसा झाला मृत्यू ?

सोमवारी सकाळी काळे हे युनोच्या कर्मचाऱ्यांसह प्रवास करत एका हॉस्पिटलमध्ये जात होते, त्याच वाहनावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. काळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.