‘कुंभ बिलकुल फालतू आहे, त्याला काही…’, दिल्ली स्थानक चेंगराचेंगरीवर लालूप्रसाद यादव याचं वक्तव्य

| Updated on: Feb 16, 2025 | 8:53 PM

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत.

‘कुंभ बिलकुल फालतू  आहे, त्याला काही...’, दिल्ली स्थानक चेंगराचेंगरीवर  लालूप्रसाद यादव याचं वक्तव्य
Follow us on

शनिवारी रात्री नवी दिल्ली स्थानकावर भीषण अपघात घडला. प्रयागराज येथे जाणाऱ्या गाडीची चुकीची अनाऊन्समेंट झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडून चेंगराचेंगरी होऊन १८ प्रवासी गर्दीत चेंगरुन ठार झाले आहेत. या घटनेत दोन डझन लोक जखमी झाले आहेत. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास १३ आणि १४ क्रमांकाच्या फलाटावर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. फलाटांवर प्रयागराज पोहण्यासाठी अनेक भाविक जमल होते. अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि गर्दीच्या प्रवाहात माणसे चिरडली गेली. या प्रकरणात माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यांनी आपल्या शैलीत टीपण्णी करीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनामाची मागणी केली.

चेंगराचेंगरीवर लालू याचं वक्तव्य

ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मी बळीत व्यक्तीच्ंया नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त करीत आहे. रेल्वेचे हे अनियोजन आहे ज्यांच्यामुळे एवढे जीव गेले आहेत. रेल्वेमंत्र्यानी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. कुंभला काही अर्थ नाहीए. फालतू आहे कुंभ अशीही टीका लालप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

येथे पाहा पोस्ट –

कसा झाला अपघात

नवी दिल्ली स्थानकाच्या फलाट क्रमांक १४ आणि १६ वरील कथित रुपाने चालविणाऱ्या दोन ट्रेनना रद्द करण्याची अफवा पसरून घबराट पसरून पळापळ सुरु झाली आणि ही चेंगराचेंगरी सुरु झाली.त्यामुळे हा भीषण अपघात घडला.या प्रकरणात आता रेल्वेने अंतर्गत चौकशी सुरु केली आहे.

रेल्वेची मदत जाहीर

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत.