दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री (Lalu Prasad) लालू प्रसाद हे गेल्या काही वर्षांपासून जेलमध्ये आहेत. मात्र, बिघडत्या तब्येतीमुळे ते त्रस्तही आहेत. (kidney transplant) किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांना सिंगापूरला जावे लागणार आहे. परंतु , (CBI) सीबीआई कोर्टाकडून त्यांना परवानगी मिळते की नाही याकडे लक्ष लागले होते. अखेर लालू प्रसाद यांच्या विनंतीला मान देऊन कोर्टांने त्यांना उपचारासाठी सिंगापूरला जाण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत लालू प्रसाद यांना देश सोडून जाण्याची परवानगी नव्हती, पण आता उपचारामुळे कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
लालू प्रसाद यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार होणार आहेत. पण याकरिता त्यांना परदेश जाता येत नव्हते. शुक्रवारी सीबीआईच्या कोर्टात यावर सुनावणी झाली. लालू प्रसाद यांच्या वकिलाने त्यांच्या तब्येतीचा हवाला देत त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावरुन कोर्टाने संवेदनशीलता दाखवत पासपोर्ट काढण्याबरोबच सिंगापूरला जाण्याचीही परवानगी दिली आहे.
24 सप्टेंबर रोजी लालू प्रसाद हे सिंगापूरकडे जाणार आहेत. याच ठिकाणी किडनी प्रत्यारोपण केले जाणार आहे. याकरिता त्यांनी आधीच सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलीय. चारा घोटाळ्यावरून लालू प्रसाद यांचा पासपोर्ट हा सीबीआयच्या विशेष कोर्टांने जमा करुन घेतला आहे.
यापूर्वीही लालू प्रसाद यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी परवानगी मागितली होती. पण कायदेशीर बाबींमुळे त्यांना परवानगी मिळाली नव्हती. लालू यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यामुळे डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कोर्टांने त्यांना उपचारासाठी ही परवानगी दिलेली आहे.
सिंगापूर येथील उपचारादरम्यान लालू प्रसाद हे त्यांच्या मुलीच्या येथे वास्तव्यास असणार आहेत. त्यांच्या माध्यमातूनच ही अपॉईटमेंट घेण्यात आली आहे. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य ही सिंगापूरमध्येच वास्तव्यास आहे.
यापूर्वीही लालू प्रसाद यांनी अशाच पद्धतीने कोर्टाकडे मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी ही फेटाळण्यात आली होती. पण मध्यंतरी एका खासगी डॉक्टराने किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच कोर्टांनेही योग्य निर्णय झाला.