हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मणिकर्ण येथे गुरुद्वाराजवळ भूस्खंलन होऊन ढीगाऱ्या खाली सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.गुरुद्वाराजवळ एक झाड पडल्याने हे सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दुर्घटनेच्या वेळी हे सर्व लोक रस्त्याच्याकडेला एका झाडा खाली बसले होते.
अचानक दरड कोसळल्याने डोंगरावरुन आलेला माती आणि दगडांचा ढीगारा झाडावर आदळला. त्या वजनाने झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. यामुळे त्या झाडाखाली बसलेले लोक चेंगरले गेले. अधिकृतरित्या मिळालेल्या माहीतीनुसार या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला स्टॉल चालविणाऱ्याचा मृत्यू झाला. तर सुमो कारमध्ये बसलेल्या दोन लोकांसह तीन पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहीती समजताच पोलीसांनी सर्व सहा लोकाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य संपले आहे. लॅण्ड स्लाईडमुळे एका मोठे झाड उखडून रस्त्यावर पडल्याने या झाडाखाली येऊन चार तीन ते चार गाड्यांचा चक्काचूर झाला. यात बसलेले पर्यटकांसह स्थानिक लोक गंभीर जखमी झाले त्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे एडीएम कुल्लू अश्वनी कुमार यांनी सांगितले आहे.
या वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात नेले आहे. जिथे डॉक्टरांनी तपासून सहा जणांना मृत घोषीत केले. काही लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली आहे. या भूस्खलनामुळे कुल्लू ते मणिकर्णला जोडणाऱ्या रस्त्यावर माती आणि दगडांचा मोठा ढीगारा साचला आहे आणि त्यामुळे वाहतूकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती पाहून पोलिसांनी मणिकर्ण आधी वाहतूक वळवली आहे.