नवी दिल्लीः ज्या आपने भ्रष्टाचाराविरोधात देशभर नारा दिला त्याच आपवर (AAP) आता भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मनीष सिसोदियानंतर चर्चेत आलेल्या आप पक्षातील घोटाळ्याविरोधात आता उपराज्यपालांनीच त्यात उडी घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना (Deputy Governor V. K. Saxena) यांनी डीटीसी बस (DTC Bus) खरेदी घोटाळ्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर दिल्ली सरकारने उपराज्यपालांवर पलटवार करत बस खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले होते, आणि त्यानंतर बस खरेदीच केल्या गेल्या नाहीत.
त्यामुळे राज्यपालांवर आपकडून गंभीर आरोप करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले असल्याचे आपने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढच होताना दिसून येत आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांनी डीटीसी बस खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्याचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.
मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालानंतर उपराज्यपालांनी या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. या आधी दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे आदेशही उपराज्यपालांनीचे दिले होते. त्यानंतर त्यांनी 1 हजार बस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांनी त्याची चौकशी सीबीआयकडे दिली आहे.
बस घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर मात्र आपने पलटवार करत उपराज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. आपने स्पष्टपणे म्हटले आहे की, बस खरेदीचे टेंडर रद्दच करण्यात आले होते, त्यामुळे बस कधी खरेदी केल्याच नाहीत. त्यामुळे दिल्लीला सध्या शिकलेल्या सवरलेल्या उपराज्यपालांची गरज असल्याचे म्हटले आहे.
कारण उपराज्यपालांना आपण कशावर सह्या करतो आहोत तेच कळत नाही. तर उपराज्यपालांवरही गंभीर आरोप करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही चौकशी लावली असल्याची टीका केली आहे.
या चौकशी नंतर आपने म्हटले आहे की, अशा चौकशीतून अजूनपर्यंत काहीच सिद्ध झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांविरोधात बिनबुडाच्या आरोपानंतर आता ते चौथ्या मंत्र्याविरोधात तक्रार करत आहेत मात्र आधी आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर द्या असंही त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीच्या उपराज्यपालांवर आपनेही गंभीर आरोप केले आहेत. आपकडून म्हटले आहे की, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी 1400 कोटींचा घोटाळा झाला असून खादी ग्रामोद्योग विभागाचे टेंडर न काढताच त्यांनी आपल्या मुलीला त्याचा ठेका दिला होता असा आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे.
त्यामुळे त्यांनी ज्या बस घोटाळ्याचे आदेश दिले आहेत त्या बस खरेदीचे टेंडरच रद्द करण्या आले होते. त्यामुळे सध्या दिल्लीला शिकल्या सवरलेल्या उपराज्यपालांची गरज असल्याची टीका करण्यात आली आहे.