नवी दिल्ली : ओडिसा (Odisa) राज्यात सहा जिल्ह्यात वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल ओडिसा (odisa news in marathi) जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. काल तिथल्या राज्यातील प्रशासनाने वीज पडून खुर्दा जिह्यात चार, बोलांगीर जिल्ह्यात दोन, अंगुल, बौध, जगतसिंहपुर आणि ढेंकनाल या जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर खुर्दा (khurda) जिल्ह्यात आणखी तीन लोक जखमी झाले आहेत.
ओडिसा राज्यात काल मुसळधार पाऊस झाला आहे, भुवनेश्वर आणि कटक या शहरात अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढच्या चार दिवसात अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलं आहे की, त्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. भुवनेश्वर आणि कटक या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून गरज असल्यास बाहेर पडावे असं आवाहन केलं आहे.
ज्यावेळी राज्यात कुठेही पावसाची शक्यता असेल त्यावेळी लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, तिथल्या प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एचआर बिस्वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, ईशान्य बंगालच्या उपसागरातही एक चक्री चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याचबरोबर आणखी एक वादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत.
देशात अनेक राज्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात कमी पाऊस होईल असं जाहीर केलं होतं.