राजगड : सध्या बाबा लोकांची चांगलीच क्रेझ आहे. मोफत वैद्यकीय शिबीरांपेक्षा जास्त गर्दी बाबांच्या दिव्य दरबारात होतांना दिसत आहे. यामध्ये चुक बरोबर हा मुद्दा प्रत्त्येकाच्या मान्यतेनूसार वेगवेगळा आहे. असे असले तरी लोकांना भुरळ घालण्यात बाबा लोकं यशस्वी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. धिरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri Divya Darbar) यांचा दिव्य दरबारी चर्चा रंगात असतानाच आता आणखी एका बाबाने सेम टू सेम दरबार लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दरबारातच या बाबाच्या दरबारात लोकांच्या रांगा लागायला सुरूवात झाली आहे. समस्येने त्रस्त असलेले लोकं तुफान गर्दी करतांना दिसत आहेत.
धीरेंद्र शास्त्री यांच्या पावलावर पाउल ठेवत हनुमंत दास नावाच्या तरुण पुजार्याने हनुमान मंदिरात दोन दिवस दिव्य दरबार भरवला होता. तिथे प्रचंड गर्दी तर होतीच, पण पुजारीही गर्दीतून लोकांना नावाने हाक मारून समस्या सोडवण्याचे आश्वासन देताना दिसत होते. रविवारी आणि सोमवारी हा दरबार भरतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता एप्रिलमध्ये पुजाऱ्याचा तीन दिवसीय दरबार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हनुमंत दास 30 वर्षांचे असून वयाच्या 19 वर्षापासून ते देवपूजा करत असल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनागडच्या शिवधाममध्ये गावकऱ्यांनी भागवत कथेचे आयोजन केले होते. याच काळात कथाकार महेश शास्त्री आणि आकाश शास्त्री यांनी दैवी दरबारी हनुमंत दास यांच्याविषयी ग्रामस्थांना सांगितले होते. यानंतर गावकऱ्यांनी हनुमंत दास यांना दरबारासाठी बोलावले. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यासारखा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस त्यांनी दिव्य दरबार भरवला. यावेळी कथा मंडपात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.