लग्नाशिवाय एकत्र राहातात, मुलांना जन्म घालतात, काय आहे परंपरा ?

| Updated on: Nov 06, 2024 | 3:20 PM

लिव्ह इन रिलेशनशिपच्या नावाने आजही शहरातील काही मंडळी नाक मुरडत असतात.परंतू देशात एका ठिकाणी अनेक वर्षांपासून लग्न न करता एकत्र राहाण्याची आणि मुलं जन्माला घालण्याची प्रथा आहे.

लग्नाशिवाय एकत्र राहातात, मुलांना जन्म घालतात, काय आहे परंपरा ?
Follow us on

मुंबई आणि दिल्लीत सारख्या शहरात लग्नाआधी एका घरात लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये राहाणे सर्वसामान्य म्हटले जाते. परंतू छोट्या शहरात यास अजूनही मोठा गुन्हा मानलं जाते.गावात अशा प्रकारच्या रिलेशन शिपला मोठा विरोध होत असतो. अशात भारतात असे एक जिल्हा आहे. जेथे लिव्ह इन रिलेशनशिप ही सामान्य गोष्ट आहे. राजस्थान आणि गुजरात राहणाऱ्या गरासिया जमातीत ही परंपरा आहे. या जमातीत पुरुष आणि महिला विवाहा शिवाय एकत्र राहू शकतात. तसेच महिला लग्ना आधी मुलंही जन्माला घालू शकतात. महिलांना आपला आवडता वर निवडण्याचा अधिकार आहे.त्यामुळे जमात प्रगत मानली जाते.

येथे विवाहासाठी दोन दिवसांच्या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात मुले आणि मुली एकत्र येतात. जर ते कोणाला पसंत करत असतील मेळाव्यातून एकत्र पळून जातात. त्यानंतर ते लग्न न करता एकत्र राहातात.त्यानंतर मुलांनाही जन्माला घालतात.त्यानंतर ते आपल्या गावी जातात आणि मग त्यांचा विवाह धुमधडाक्यात केला जातो.

या समाजात लिव्ह-इन मध्ये रहाण्याची ही प्रथा शेकडो वर्षांची आहे.अशी मान्यता आहे की जातीचे चार भाऊ गाव सोडून गेले होते.आणि राहू लागले होते. तिघांनी परंपरेनुसार लग्न केले. तर एक भाऊ लग्न न करताच मुलीसोबत राहु लागला.त्या तीन भावांना मुल झाले नाही. परंतू लग्न न करता राहणाऱ्या मुल झाले त्यानंतर ही प्रथा सुरु झाली.

गरासिया महिलांना जर वाटले तर आधीच पार्टनर असतानाही मेळाव्यात दुसरा पार्टनर निवडू शकतात. अशा प्रकारचे स्वातंत्र्य आधुनिक समाजात देखील मिळत नाही.यामुळे ही जमात जगभर प्रसिद्ध आहे. भारतात आणखी देखील जाती आहेत ज्यात अशी परंपरा आहे.