Lok Sabha 2024 : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये BJP ला किती नुकसान ? प्रशांत किशोर यांनी केला मोठा दावा ?

| Updated on: May 27, 2024 | 9:05 PM

काही लोकांचे म्हणणे आहे की यंदा राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपाच्या जागा कमी होत आहेत. परंतू मला तरी अजून तरी कोणी असा भेटला नाही जो असा दावा करेल की विरोधी पक्ष एखाद्या राज्यात संपूर्ण विजय मिळवेल असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

Lok Sabha 2024 : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये BJP ला किती नुकसान ? प्रशांत किशोर यांनी केला मोठा दावा ?
Prashant kishor
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतीकार म्हटले जाते. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भविष्यवाणी केली जात आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपाबाबत मोठा अंदाज वर्तविला आहे. भाजपा 370 वर पोहचणार नाही असे म्हटले जात आहे. परंतू भाजपाला किमान किती जागा मिळतील हे देखील त्यांनी सांगितले आहे. पाहूयात काय अंदाज त्यांनी वर्तविला आहे …एका चॅनलशी बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की भाजपाची तुलना यावेळी भाजपाच्या 2019 च्या लोकसभा निवडणूकांशी केली जात आहे. भाजपाने गेल्या लोकसभा निवडणूकांत 303 जागा जिंकल्या होत्या. प्रशांत किशोर यांनी सांगितले की गेल्या निवडणूकांत भाजपाने ज्या 303 जागा जिंकल्या होत्या. त्या भाजपाने कोठून जिंकल्या होत्या याची माहीती घेऊयात…या 303 जागापैकी भाजपाने 250 जागा नॉर्थ वेस्टमधून जिंकल्या होत्या. यावेळी मात्र भाजपाला या नॉर्थ वेस्टमधून 50 हून जास्त जागांचे नुकसान होणार आहे.

 पूर्व-दक्षिणमध्ये भाजपाचा फायदा ?

भाजपाला पूर्व-दक्षिणमध्ये फायदा होईल असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्रप्रदेश या क्षेत्रात भाजपाकडे आता 50 जागा आहेत. परंतू या निवडणूकांत या राज्यामध्ये भाजपाचे मतदान टक्केवारी आणि दोन्ही वाढली आहे. बंगाल, ओडीशा, आसाम, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि केरळमध्ये भाजपाच्या जागा 15-20 वाढत आहेत. कोणत्या राज्यात किती वाढतील हे महत्वाचे नाही. प्रशांत किशोर म्हणाले की सेफोलॉजिस्ट योगेंद्र यादव यांनी सांगितले की भाजपाच्या 272 जागा येणार नाहीत. त्यांच्या मते ते 268 जागांवरच भाजपाची घौडदौड थांबेल असे म्हणत आहेत. तरीही सत्तेत भाजपाच येईल असे यादव यांचे म्हणणे आहे. लोकांना वाटतेय की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठे नुकसान होणार आहे.

युपी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये काय होणार ?

महाराष्ट्रात विरोधी पक्षाला कमाल 20-25 जागा जरी जिंकल्या तरी सध्या भाजपाला महाराष्ट्रात 23 जागा आहेत. त्यामुळे भाजपाचे नुकसान यंदाही होणार नाही. काही लाकांचे म्हणणे आहे की भाजपाला उत्तर प्रदेशात नुकसान होत आहे. परंतू लोक हे विसरत आहेत की गेल्यावेळी भाजपाला 2014 च्या तुलनेत बिहार आणि युपीत जवळपास 25 जागांचे नुकसान झाले होते. कारण समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र लढले होते. जर कोणी म्हणत असेल की उत्तर प्रदेशात भाजपाच्या 20 जागा कमी होतील तर माझे असे म्हणणे आहे की भाजपाचे नुकसान कुठे झाले आहे. ते आधीच 18 जागा हरले आहेत. भाजपाला नुकसान तेव्हाच होईल जेव्हा भाजपाला 40 ते 50 जागांचे नुकसान होईल. परंतू असे विरोधी पक्ष देखील म्हणत नाहीत, ना सत्ताधारी. प्रशांत किशोर यांनी सांगितले की यंदा बिहारमध्ये असे तरी काही दिसत नाही.