लोकसभेची निवडणूक सुरु आहे. बिहारमध्ये पण निवडणुकीची धामधूम आहे. भाजपला झिडकारुन नितीश यांनी लालू यांच्या आरजेडीचा कंदिल पण हाती धरला. त्यानंतर INDIA आघाडीत हाती काहीच लागत नसल्याचे लक्षात येताच नितीश बाबू पुन्हा भाजपच्या गोटात दाखल झाले. आता त्यांचा निशाण्यावर अर्थातच राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस आहे. आता सध्या बिहारी ढंगात एकमेकांच्या उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहे. पण नितीश बाबूंचा आरोप करताना तोल ढळला आहे.
टीका करताना विसरले भान
तर शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. पण नितीश बाबू टीका करताना भान विसरले. त्यांनी थेट कुटुंबावर हल्ला केला. ” जरा सांगा तरी, कोणी इतके मुलं कुठं जन्माला घालतं का? एका मुलाच्या इच्छेने नऊ-नऊ मुलं पैदा केली. त्यांनी मला सांगितलं की, त्यांना (लालू प्रसाद यादव) मुलगा होत नव्हता, त्यामुळे त्यांनी नऊ-नऊ मुलं पैदा केली. इतकं होऊन पण त्यांना नेताजी करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत करत आहेत.” असे नितीश कुमार म्हणाले.
कुटुंबासाठी सतत चिंताग्रस्त
वाराणसीमध्ये नाही गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे अनेक दिग्गज नेते. एनडीएमधील घटक पक्षांचे नेते, मुख्यमंत्री झाडून यावेळी उभे होते. नितीश कुमार पण जाणार होते. पण त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर काल घेतलेल्या सभेत त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.