निवडणुकीच्या आखाड्यात लव्हर्स पार्टीचे काय काम; देशातील राजकीय पक्षांची विचित्र नावं तुम्हाला माहिती आहेत का?

| Updated on: Apr 20, 2024 | 2:49 PM

Lok Sabha Election 2024 : भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे.अनेक दिग्गज पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पण काही राजकीय पक्षांची नावे तर इतकी विचित्र आहेत की तुम्ही म्हणाल यांचं या राजकीय भानगडीत काम तरी काय?

निवडणुकीच्या आखाड्यात लव्हर्स पार्टीचे काय काम; देशातील राजकीय पक्षांची विचित्र नावं तुम्हाला माहिती आहेत का?
राजकीय पक्षांची अशी पण विचित्र नावे
Follow us on

Funny Name Of Political Party : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकशाहीचा अभूतपूर्व उत्सव सुरु आहे. देशभरात राजकीय उत्साह दिसून येत आहे. भरउन्हात दिग्गज घाम गाळत आहेत. तर उन्हाचे चटके खात जनता त्यांचे कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांवर टाळ्या पिटत आहेत. या सर्व हंगामात एक गोष्ट अनेकांच्या नजरेतून सुटली आहे, ती म्हणजे या दिग्गज राजकीय पक्षांसोबत काही विचित्र नाव असलेले पक्ष पण मैदानात उतरले आहे. तुम्ही बारकाईने उमेदवारांची नावे आणि त्यांचा पक्ष लक्षात घेतला तर ही विचित्र नावे तुमच्या पुढ्यात असतील.

लव्हर्स पार्टी पण मैदानात

भारताच्या राजकीय आखाड्यात काही पक्षांची नावे फारच मनोरंजक आहे. त्यांचा अजेंडा, नेते सर्व बाजूला ठेवा. पण या पक्षांची नावे तुमचे मनोरंजन केल्याशिवाय राहणार नाहीत. भारतात, इंडियन लव्हर्स पार्टी, इंडियन बिलिव्हर्स पार्टी, इंडियन मानुष पार्टी, नॅशनल टायगर पार्टी, पिरॅमिड पार्टी ऑफ इंडिया आणि वीरों की वीर इंडियन पार्टी यांचा समावेश आहे. ही नावे तुम्ही कधी यापूर्वी ऐकली होती का? तुमच्या मतदारसंघात पण एकदा नमुना तुम्हाला सापडल्या शिवाय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

अशा पक्षांचा देशात महापूर

Times of India मध्ये याविषयीचे एक वृत्त आहे. त्यानुसार, भारतात नोंदणीकृत अपरिचित पक्षांचा (Registered Unrecognized Political Parties-RUPP) माहापूर आलेला आहे. निवडणूक आयोगाच्या डेटानुसार, देशात मे 2022 पर्यंत असे 2,796 पक्ष होते. सर्वात मोठी अडचण म्हणजे हे पक्ष दीर्घकाळ टिकत नाहीत. हे पक्ष अनेक निवडणुका लढवत नाहीत. हे पक्ष काही निवडणुका लढवतात. पण त्यात त्यांना फारशी मते मिळत नाहीत.

कोणत्या राज्यात काय नाव?

  1. देशातील प्रत्येक राज्यात अशा विचित्र नावाचे राजकीय पक्ष आहेत.
  2. तामिळनाडूमध्ये इंडियन लव्हर्स पार्टी आहे.
  3. तेलंगाणामध्ये इंडियन बिलिव्हर्स पक्ष या विचित्र नावाचा पक्ष
  4. पश्चिम बंगालमध्ये इंडियन मानुष पार्टी अशा नावाचा पक्ष
  5. महाराष्ट्रात वीरांचा वीर इंडियन पार्टी नावचा पक्ष
  6. भारतात 20-20 पार्टी आणि हायटेक पार्टी नावाचा पक्ष पण आहे.
  7. ओडिशामध्ये सोशलिस्ट वर्क्स पार्टी तर गुजरातमध्ये राईट टू रिकॉल पार्टी
  8. हरियाणात आरक्षण विरोधी पार्टी नावाचा पक्ष आहे
  9. याशिवाय सबसे अच्छी पार्टी आणि उत्तर प्रदेशात आपकी अपनी पार्टी नावाचे पक्ष