Lok Sabha Election 2024 | अफवांच्या बाजारात सत्य कसं कळणार? निवडणूक आयोगाचा असा रामबाण उपाय

| Updated on: Mar 16, 2024 | 4:32 PM

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अफवा आणि फेक न्यूज देणाऱ्यांची खैर नसेल. त्यांच्याविरोधात कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे. अफवांच्या बाजारात मतदारांपर्यंत सत्य पोहचविण्यासाठी आयोगाने हा रामबाण उपाय केला आहे.

Lok Sabha Election 2024 | अफवांच्या बाजारात सत्य कसं कळणार? निवडणूक आयोगाचा असा रामबाण उपाय
Follow us on

नवी दिल्ली | 16 March 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु होईल. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा केली आहे. कोणत्याही निवडणुकीत अफवा आणि फेक न्यूजचे प्रमाण अधिक असते. सध्या डिजिटल युगात हा धोका अधिक वाढला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण कंबर कसली आहे. अफवा आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेण्यात येणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. अफवांच्या बाजारात योग्य माहिती, सत्य मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी आयोग खास यंत्रणा राबविणार आहे.

राजकीय पक्षांना सल्ला

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीतील जहाल, विषारी आणि धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाषेचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी देशातील राजकीय पक्षांना धार्मिक टीका-टिप्पणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच प्रचारादरम्यान विखारी भाषा न वापरण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. निवडणूक काळात खोट्या बातम्या पसरवणारे, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. आयोग काय सत्य आणि काय खोटे याची माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

आयोगापुढे ही आहेत चार आव्हाने

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने होण्याची वकिली केली. आयोगासमोर चार आव्हाने, 4M असल्याचे ते म्हणाले. यामध्ये मसल पॉवर (Muscle), पैसा (Money), चुकीची माहिती (Misinformation) आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन (MCC Violations) यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंसेचा तर विचार पण करु नका

निवडणुकीत हिसेंला बिलकूल थारा नसल्याचा सज्जड दम आयुक्तींनी दिला. निवडणुकीत रक्तपाताला आणि हिंसेला अजिबात थारा नाही. आयोगाला जिथे हिंसाचाराची अथवा त्यासंबंधीची माहिती मिळेल, तिथे कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील 11 राज्यातील निवडणुका या शांततेत पार पडल्या. या निवडणुका हिंसा मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या राज्यांमध्ये जवळ जळव पूनर्मतदानाची गरज पडली नाही, असे ते म्हणाले.

2100 पेक्षा अधिक पर्यवेक्षक  

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 2100 पेक्षा अधिक पर्यवेक्षक नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये सामान्य, पोलिस आणि इतर निरीक्षक तैनात करण्यात येतील. तेच आयोगाचे कान आणि डोळे असतील. प्रलोभन मुक्त आणि भयमुक्त निवडणुका होण्यासाठी हे पर्यवेक्षक डोळ्यात तेल घालून काम करतील.