एक्झिट पोल 2024 : कसोटीवर किती खरे उतरतात Exit Polls? 2019 मधील अंदाज किती ठरला खरा, सविस्तर जाणून घ्या

| Updated on: May 30, 2024 | 3:07 PM

Lok Sabha Election 2024 Exit Polls : या 25 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानंतर सर्वांच्या नजरा एक्झिट पोलवर खिळतील. पण हे अंदाज पंचे किती अचूक ठरतात?

एक्झिट पोल 2024 : कसोटीवर किती खरे उतरतात Exit Polls? 2019 मधील अंदाज किती ठरला खरा, सविस्तर जाणून घ्या
निवडणुकीचा कल किती ठरतो अचूक
Follow us on

लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी झाले. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होईल. त्यानंतर सर्वांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागेल. 542 जागांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल. कोणाचे सरकार येईल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर येतो. गुजरातमधील सुरतची जागा भाजपने अगोदरच खिशात घातली आहे. उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. 4 जून 2024 रोजी निकाल समोर येतील. त्यापूर्वी 1 जून रोजी संध्याकाळी विविध एजन्सीज एक्झिट पोल जाहीर करतील. मग त्यांचे हे अंदाज पंचे किती अचूक ठरतात?

2019 मध्ये काय होता अंदाज?

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर काँग्रेसच्या पारड्यात निराशेशिवाय काहीच नव्हते. 2024 प्रमाणे 2019 मध्ये विरोधक एकटवलेले नव्हते. त्यांची इंडिया आघाडी नव्हती. युपीए अंतर्गत ते निवडणुकीत उतरले होते. तर अनेक पक्षांनी स्वतंत्र लढाई केली.

हे सुद्धा वाचा

दोन एंजन्सीचे अंदाज वगळता सर्वांनी भाजप नेतृत्वातील एनडीए 300 जागांच्यावर जिंकेल असा अंदाज वर्तविला होता. काँग्रेस तर तीन अंकी आकडा गाठू शकणार नसल्याचा अंदाज होता. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये युपीए 100 जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अंदाज होता. इतर काही संस्थांनी युपीए 120 जागा जिंकण्याचा कल दिला होता. भाजप सर्वाधिक जागा मिळवेल तर त्या पाठोपाठ काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

मग निकालात काय आले समोर?

2019 मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली होती. एकूण 543 जागांपैकी, सर्वसाधारण 411, अनुसूचीत जाती 84, अनुसूचीत जमाती 47 अशा 542 जागांवर निवडणूक झाली. तामिळनाडूतील वेल्लोर येथे मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 91.05 नोंदणीकृत मतदार होते. त्यातील 61.08 कोटी मतदारांनी मताधिकार वापरला होता. 67.01 टक्के पुरुष, 67.18 टक्के महिलांनी तर 14.58 टक्के इतरांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

या लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे 2029 रोजी जाहीर करण्यात आले होते. निवडणुकीचे निकालावरुन एक्झिट पोलचे अंदाज जवळजवळ खरे ठरले. भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा स्वबळावर सत्तेत दाखल झाला. भाजपने सर्वाधिक 303 जागांवर विजयी पताका फडकवली. तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस केवळ 52 जागांवर अडकली. तृणमूल काँग्रेस 22, बसपा 10, भाकपा आणि माकपा अनुक्रमे 2 आणि 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर विजयी झाली.