लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पारचा नारा गाजला आहे. पूर्ण बहुमताची दवंडी भाजपने अगोदरच दिली आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झालीच तर भाजपकडे प्लॅन बी आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत या प्रश्नाला थेट उत्तर दिले आहे. वृत्तसंस्था ANI ने त्यांची ही मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक बाजू मांडली. मतदानाची घसरलेली टक्केवारी आणि त्याच्या परिणामावर पण त्यांनी मत मत मांडले.
अमित शाह यांचे रोखठोक उत्तर काय
‘एएनआय’ ला त्यांनी मुलाखत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, याची खात्री असल्याचे अमित शाह म्हणाले. जर भाजप बहुमत गाठू शकलं नाही तर, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाला त्यांनी ‘प्लॅन बी तेव्हाच तयार करतात, जेव्हा प्लन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असते.’ असं रोखठोक उत्तर दिलं.
400 जागा हव्यात कशाला?
संविधान, घटना बदलण्यावर दिली ही प्रतिक्रिया
भाजपचे सरकार बहुमताने आल्यास संविधान, घटना बदलणार असा आरोप करण्यात येतो. त्यावर अमित शाह यांनी पलटवार केला. भाजपकडे गेल्या 10 वर्षांपासून बहुमत आहे. पण आम्ही असा प्रयत्न कधी केला नाही. माझ्या पक्षाचा बहुमताच्या दुरुपयोग करण्याचा इतिहास नाही. बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधी यांच्यावेळी काँग्रेसने केला होता, असा हल्लाबोल त्यांनी केला.
#WATCH | ‘Does BJP have a plan B in case it doesn’t reach the majority mark?’ Union Home Minister Amit Shah answers.
“Plan B needs to be made only when there is less than a 60% chance for Plan A (to succeed). I am certain that PM Modi will come to power with a thumping… pic.twitter.com/beX5Msk2Cf
— ANI (@ANI) May 17, 2024
केजरीवाल यांना क्लीन चीट नाही
केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला. त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मत व्यक्त केले. केजरीवाल यांना ही क्लीनचीट नाही. कोर्टाने केवळ निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत त्यांना सोडले आहे. ते जिथे पण जातील, जनतेला मद्यघोटाळाच आठवेल, असा टोला पण त्यांनी लगावला.
ओडिशात सरकार बदलणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशा आणि काश्मीरबाबत मोठं भाकित केलं. ओडिशात सरकार बदलणार असा दावा त्यांनी केला. काश्मीरमध्ये पूर्वी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्या जायचा. आता काश्मीरमध्ये मतदान होते. पहिल्यांदा 40 टक्के काश्मीर पंडितांनी मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.